विधिसंघर्षित बालकासह एकजण ताब्यात
सिडको : प्रतिनिधी
कत्तलीच्या उद्देशाने कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता गोठ्यात डांबून ठेवलेल्या दहा गोवंशांची सुटका करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकला यश आले आहे. याप्रकरणी एका इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.एका विधिसंघर्षित बालकाचीही चौकशी करण्यात आली आहे.
गुन्हेशाखा युनिट क्रमांक 1 मधील पोलीस हवालदार विशाल काठे आणि पोलीस अंमलदार अमोल कोष्टी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कमलवाडी-निमसे मळा परिसरातील एका गोठ्यावर छापा टाकण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड तसेच पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख व समाधान पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यादरम्यान गोठ्यात दहा गोवंश जनावरे बांधून ठेवलेली आढळली. जनावरांसाठी चारापाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी काल्या उर्फ इर्शाद अब्दुल रहमान कुरेशी (वय 38, रा. दिंडोरी रोड, नाशिक) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ही जनावरे अन्य व्यक्ती आणि एका विधिसंघर्षित बालकाकडून आणण्यात आल्याची माहिती समोर आली.
संबंधित बालकाची चौकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठी संगमनेर येथे नेण्यात येणार होती. या कारवाईत सुमारे एक लाख 90 हजार रुपये किमतीच्या दहा गोवंशांची सुटका करण्यात आली. सुटका केलेली जनावरे तपोवन येथील कृषी गोसेवा ट्रस्टकडे संगोपनासाठी सुपूर्द करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपासासाठी संशयितास आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Rescue of 10 confined cattle
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…