पंचवटी : प्रतिनिधी
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार, दि. 23 रोजी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येऊन जवळपास 64 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या मोहिमेदरम्यान तपोवन, साधुग्राम, नांदूर नाका, जत्रा हॉटेल व धात्रक फाटा, निलगिरी बाग परिसरात कोम्बिंग ऑपरेशन कारवाईदरम्यान घरफोडीचे आठ आरोपी, तडीपार दोन आरोपी, शस्त्र अधिनियम अनुषंगाने सात आरोपी, विधिसंघर्षित बालक दोन यांची तपासणी केली. यात एकूण 64 टवाळखोर इसमांवर मपोका 112/117 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीत नाकाबंद दरम्यान 25 वाहनांची तपासण्यात आली. तीन वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच चार कोटपाच्या कारवाई करण्यात आली. कोंबिंग ऑपरेशनमध्ये पाच अधिकारी व 42 अंमलदार सहभागी झाले होते.
Action taken against 64 loafers within the jurisdiction of Adgaon Police Station.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…