भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण : पुढार्यांचे गुरू तपासाच्या रडारवर
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
स्वत:ला ज्योतिषी भासवणारा आणि महिलांचे लैंगिक शोषण करणारा अशोक खरात याच्या त्र्यंबकेश्वर कनेक्शनची तपासणी होत आहे. यासाठी पोलीस, महसूल यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गैरमार्गाने मिळवलेल्या गुंतवणुकीसाठी त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसर मागच्या काही वर्षांत अशा भोंदूबाबांचे आणि भ्रष्टाचारी अधिकारी, पुढारी यांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहे. विशेषत: रिसॉर्टच्या स्वरूपात होणारी गुंतवणूक मोठी आहे.
त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात असे काही तथाकथित बुवाबाजी करणारे बाबा आहेत का? याचा धांडोळा घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भोंदूबाबा अशोक खरात त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक विधींच्या सोबत साधर्म्य दाखवत नागपूजा करत होता. सिन्नर जवळच्या मिरगाव येथील आश्रमात कृत्रिम इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असलेला 20 फुटी नाग दाखवून त्याची पूजा करायचा. त्यामुळे त्याचे त्र्यंबकेश्वर येथे काही कनेक्शन आहे का? याची माहिती घेण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात त्याच्या राजकीय शिष्य परिवाराने मोठी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. त्यासाठी तो आशीर्वाद व सल्लादेखील देत होता. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार की नाही? कोणत्या दिशेला आणि किती क्षेत्र घ्यायचे असले सल्ले देऊन स्वतःच्या तुंबड्या भरत होता. त्याने काही भागीदारी केली असावी, असा संशय तपास यंत्रणांना असल्याने त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील गुंतवणुकीचे रेकॉर्ड त्यांच्या रडारवर आले आहे.
भोंदूबाबा खरातसारखे पुढार्यांचे ज्योेतिषी असल्याच्या चर्चा येथे नेहमीच घडत असतात. त्यांचे दिवसेंदिवस विस्तारत असलेले साम्राज्य, विनापरवाना होत असलेली बांधकामे व नियम धाब्यावर ठेवून झालेले काम कोणाच्या आशीर्वादाने अशी चर्चा नेहमीच होत असते. येथे राजकीय पुढार्यांना आशीर्वाद देताना प्रत्यक्षात त्यांच्याच कृपाप्रसादाने मिळणार्या छत्रछायेखाली स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे उद्योग बिनबोभाट सुरू आहेत. आपण कसे त्यांचे गुरू आहोत, अशी शेखी मिरवत सर्वसामान्य नागरिकांना धाकात ठेवण्याचे काम होत होते.
राजकीय ज्योतिषांची कुंडली तपासणी
त्र्यंबकेश्वरसह परिसरात बस्तान बसवलेले, शासकीय अथवा खासगी भूखंड बळकावून त्यावर स्वत:चे प्रतिष्ठान उभारणे आदी राजकीय ज्योतिषांच्या कुंडली तपासणीचे काम सुरू झाले आहे. निवडणूक कालावधीत आणि इतर वेळेसदेखील येथे येणारे राजकारणी, उच्च अधिकारी कोणाकडे गेले होते, याचा मागोवा घेण्यात येत आहे. भविष्यात मोठी खळबळ उडवणारे प्रकार उजेडात येतील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. त्र्यंबकेश्वर शहर व परिसर हे अवैध मार्गाने मिळालेली संपत्ती दडवण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीस आणण्यामागे भ्रष्ट लोकांचा हात आहे. त्यांना शासन घडावे, अशी सर्वसामान्य नागरिक त्र्यंबकराजाकडे प्रार्थना करत आहेत.
Resorts in Trimbakeshwar and surrounding areas are being overrun by trees.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…