सातपूरमधील कार्बन नाका परिसरातील घटना
सिडको : प्रतिनिधी
दारू पिण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना कार्बन नाका परिसरात घडली. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी रिक्षाचालकाच्या घरी जाऊन त्यांच्या भावजयीला शिवीगाळ केली. तसेच घरावर दगडफेक करून फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षद उत्तम साळवे (वय 30, रा. अवध अपार्टमेंट, माळी कॉलनी, श्रमिकनगर, सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. कार्बन नाका येथील महादेव विश्वेश्वर रिक्षा थांब्यावर संकेत ऊर्फ मोनू पगारे (वय 30), सोनू पगारे (वय 32, दोघे रा. शिवाजीनगर, सातपूर) आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तिघांनी साळवे यांना दारू पिण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांनी नकार दिल्याने संशयितांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि चापट्यांनी मारहाण केली.
त्यानंतर संशयित साळवे यांच्या घरी गेले. त्यावेळी साळवे घरी नसताना त्यांनी त्यांच्या भावजयी दीपाली साळवे यांना शिवीगाळ केली. तसेच फ्लॅटवर दगडफेक करून नुकसान केले. यानंतर साळवे यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास
सुरू आहे.
Rickshaw driver assaulted for refusing to drink alcohol
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने विकत घेण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून सोन्याचे भाव…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे दोघेही पुराणमतवादी आणि उजव्या विचारसरणीचे…
नाशिक : विशेष प्रतिनिधी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा…
दहिवाळ, दरेगाव परिसरात वनविभागाची कारवाई मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने कारवाई…
कैद्यांना विक्रीसाठी आणल्याचा संशय; गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये टेपने गुंडाळून ठेवला होता अमली पदार्थ नाशिकरोड : विशेष…
सिडको : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या विविध विभागांतून जमा झालेली 14 लाख 80 हजार 336 रुपयांची…