नाशिक

नाशिकरोडच्या कारागृहात रक्षकाच्या अंगझडतीत सापडले 33 ग्रॅम चरस!

कैद्यांना विक्रीसाठी आणल्याचा संशय; गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये टेपने गुंडाळून ठेवला होता अमली पदार्थ

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
कैद्यांवर नजर ठेवण्याची आणि कारागृहाची सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचार्‍याच्याच अंगावर चरस आढळल्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. कैद्यांना विक्री करण्याच्या उद्देशाने तब्बल 33 ग्रॅम चरस कारागृहात आणल्याचा संशय असून, संबंधित कर्मचार्‍याने हा अमली पदार्थ गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये काळ्या चिकट टेपने गुंडाळून लपविला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या विशेष अंगझडतीत हा प्रकार उघडकीस आला. रवींद्र एकनाथ पाटील (वय अंदाजे 35) असे संशयित कर्मचार्‍याचे नाव आहे.
4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कारागृह रक्षक नारायण जयसिंग राजपूत आणि धनराज चव्हाण हे झडतीची जबाबदारी सांभाळत होते. याचदरम्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार कारागृहात प्रवेश करणार्‍या कर्मचार्‍यांची विशेष अंगझडती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वसंत मारोती चौधरी आणि जनरल सुभेदार विकास भरते यांच्या उपस्थितीत रवींद्र पाटील याच्यासह चार कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. या झडतीदरम्यान पाटील याच्या अंडरपॅन्टची तपासणी केली असता गुप्तांगाजवळ काहीतरी लपविल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासणी केली असता काळ्या चिकट टेपमध्ये गुंडाळलेली वस्तू आढळून आली. ती उघडून पाहिली असता त्यात चरस असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराची माहिती तत्काळ वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांना देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत पाटील याने संबंधित पदार्थ चरस असून, त्याचे वजन अंदाजे 33 ग्रॅम असल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
कारागृह अधीक्षकांनी हा चरस कोणाकडून विकत घेतला आणि कारागृहातील कोणत्या कैद्याला देण्यासाठी आणला होता, याबाबत विचारणा केली. मात्र, पाटील उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट पुढील तपास करीत आहेत.

33 grams of charas (cannabis resin) discovered during a search by a guard at the Nashik Road prison!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दानाचे महत्त्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने विकत घेण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून सोन्याचे भाव…

7 hours ago

उजव्यांना धडा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे दोघेही पुराणमतवादी आणि उजव्या विचारसरणीचे…

7 hours ago

रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी मोहीम सुरू

नाशिक : विशेष प्रतिनिधी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा…

7 hours ago

नाकाबंदीत दोन टेम्पो, ट्रकसह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

दहिवाळ, दरेगाव परिसरात वनविभागाची कारवाई मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने कारवाई…

7 hours ago

दारू पिण्यास नकार दिल्याने रिक्षाचालकाला मारहाण

सातपूरमधील कार्बन नाका परिसरातील घटना सिडको : प्रतिनिधी दारू पिण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी…

8 hours ago

महापालिकेच्या विविध विभागांतून जमा झालेली 14 लाख 80 हजार 336 रुपयांची रोकड घेऊन दोन कर्मचारी पसार

सिडको : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या विविध विभागांतून जमा झालेली 14 लाख 80 हजार 336 रुपयांची…

8 hours ago