वाहनधारकांना वळसा, अंबड ते फडोळ मळा मार्गावरील प्रकार
सिडको : प्रतिनिधी
अंबडगाव ते फडोळ मळा परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता बंद करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च वाहनधारकांच्या माथी पडत आहे.
अंबड एमआयडीसी परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. एमआयडीसीतील कामगार, दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनधारक मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात. मात्र, काँक्रीटीकरणाच्या कामासाठी अचानक संपूर्ण रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामावर जाणार्या कामगारांना पर्यायी मार्गाने फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात
अडचणी येत आहेत.
Road suddenly closed for concreting work.
- अफजल पठाण चेहरे तो बहुत मिले जिंदगी की राहों में, कुछ अपने बनकर मिले,…
- प्रणाली देशमुख तू सुंदर आहेस पण ग्लॅमरस नाही, कदाचित म्हणूनच तू गुणाची खाण जरी…
- वासवदत्ता अग्निहोत्री ‘साथी हाथ बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना....’ हिंदी चित्रपटात…
- डॉ. किशोर पवार कपडे म्हणजे निर्जीव वस्तू, अशी आपली आजवरची संकल्पना होती. मात्र, चीनमधील…
लग्नाआधी मैत्रिणींच्या गप्पा असतात कुठे फिरायला जायचं? शॉपिंगला कधी भेटायचं? आज काय प्लॅन? आणि लग्नानंतर…