मान्सूनपूर्व पावसाने रस्ते जलमय

महापालिकेचे पितळ उघड; अर्धवट कामांमुळे हाल

ड्रेनेज तुंबल्यामुळे दुर्गर्ंधीयुक्त पाणी थेट रस्त्यांवर
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या पावसाळापूर्व कामात झालेल्या दिरंगाईचा फटका मंगळवारी (दि. 2 जून) नागरिकांना बसला. दुपारच्या सुमारास आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे पितळ उघडे पाडले. अपूर्ण कामांमुळे खोदलेल्या रस्त्यातून थेट पाणी बाहेर येऊन रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य दिसले. महापालिकेने 31 मे पूर्वी रस्तेदुरुस्तीसह इतर कामे होतील असा डांगोरा पिटला होता; परंतु मंगळवारी आलेल्या पावसाने महापालिकेचा दावा फोल ठरवला.
महापालिकेने शहरात विविध भागांत पावसाळी गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. त्याठिकाणी मातीच्या ढिगार्‍यांमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य दिसले. महापालिकेने पाणी साचणारे ब्लॅक स्पॉट न हटवल्याने त्याचा फटका नागरिकांना बसल्याचे दिसले. बांधकाम विभागाने मागील वर्षाच्या मान्सूनपूर्व पावसाचा कुठलाही बोध न घेतल्याचे दिसून आले. यंदाही ब्लॅक स्पॉट हटवण्यात दिरंगाई केल्याचा फटका नागरिकांना बसल्याचे चित्र आहे.


शहरात मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास मेनरोड, शालिमार, सीबीएस, राजीव गांधी भवनसह जुने नाशिक परिसरात विजांच्या कडकडाटासह तुफान हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागरिक उकाड्याने त्रस्त होते. मंगळवारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. दुपारी अडीचपर्यंत शहरात तीव्र ऊन होते. उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. एल-निनोमुळे पर्जन्यमान कमी राहण्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. मात्र, शहरात मान्सूनपूर्व पावसाने दुपारी पावणेतीन व त्यानंतर साडेचारच्या सुमारास हजेरी लावली.

रस्तेकामाच्या ठिकाणी पाणीच पाणी
शहरात मनपाने 28 ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या रस्त्यावर एमएनजीएल, बीएसएनएलसह इतर युटिलिटीच्या कामांसाठी डक्टचे खोदकाम केले असता, त्यात पावसाचे पाणी जाऊन पाणीच पाणी झाल्याचे दिसले.

Roads flooded due to pre-monsoon rains

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *