भद्रकाली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
सिडको : विशेष प्रतिनिधी
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 6 तासांत जबरी चोरी करणार्या दोघा सराईत आरोपींना अटक करून तब्बल 10 लाख 42 हजार 632 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दि. 26 मे 2025 रोजी सकाळी 6.30 वा. दरम्यान अरमान रसीद राईन (26, उरी, उत्तर प्रदेश) हे एमएच 47 सी 0003 टीसी/1216 या क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअपमधून मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असताना नाशिकमधील द्वारका परिसरात दोन अनोळखी व्यक्तींनी मालेगावला जायचे आहे म्हणून वाहनात बसण्याचा आग्रह धरला. पुढे जुना आडगाव नाका परिसरात आरोपींनी चालकाच्या पोटावर चाकू लावून धमकी देत गाडी पळवली. त्यास वणी गावाजवळ उतरवून बोलेरो गाडी, 25 हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि 1 हजार रुपये रोख मिळून एकूण 10.42 लाखांची जबरी चोरी केली.
चालकाने तत्काळ वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे जाऊन तक्रार दिली. पुढे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा झाल्याने त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस उपायुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. दरम्यान, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मनमाड-नांदगाव रोडवर नागापूर येथे दोन आरोपींना अटक केली. जगदीश मोरे (38, चांदवड) व राहुल मोगल (35 निफाड) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याजवळून बोलेरो गाडी, मोबाइल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. विशेष म्हणजे, आरोपी जगदीश मोरे याच्यावर दिंडोरी, वणी, सटाणा, वडनेरभैरव अशा विविध ठिकाणी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, तो सध्या एका प्रकरणात फरारही होता. ही यशस्वी कारवाई गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई नरेंद्र जाधव, संदीप शेळके, लक्ष्मण ठेपणे, नारायण गवळी, धनंजय हासे, जावेद शेख, तौसिफ सय्यद यांनी केली.
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…