नाशिक

विश्वास जिंकून 21 लाखांचे हिरे-सोन्याचे दागिने लंपास

मालेगाव कॅम्प परिसरातील घटना

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव कॅम्प परिसरात दोन भामट्यांनी विश्वास संपादन करून तब्बल 21 लाख 15 हजार 721 रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिपरे कॉलनीतील मौक्तिक बंगल्यासमोरील रस्त्यावर रविवारी (दि. 22) पहाटे सुमारे 5.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी किशोरकुमार भगवान लोढा (70, रा. इन्कम टॅक्स कार्यालयामागे, मालेगाव कॅम्प) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, पांढर्‍या रंगाच्या होंडा सिटी कारमधून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी नम्रपणे संवाद साधत फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बहाणा करून विश्वासाने त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले मौल्यवान दागिने घेऊन आरोपींनी पोबारा केला.
चोरीस गेलेल्या मुद्देमालात 2.01 कॅरेट कट अँड पॉलिश्ड हिरे जडविलेली सुमारे 15.58 लाख रुपयांची सोन्याची अंगठी, एकमुखी रुद्राक्ष असलेली 3.50 लाख रुपयांची सोन्याची चेन, तसेच पुखराज खडा जडविलेली 2.80 लाख रुपयांची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. एकूण चोरीचा मुद्देमाल 21 लाख 15 हजार 721 रुपये इतका आहे.
दरम्यान, आरोपींपैकी एक जण 30 ते 35 वर्षे वयोगटातील तर दुसरा 45 ते 50 वर्षे वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. निकम करीत आहेत.

Round-the-clock police vigil now at Ramkund and Goda Ghat.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago