‘कफ’ समस्या दूर करते केशर

खरे केशर ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. खरे केशर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते. केशर ओल्या कपड्यामध्ये रगडावे. केशर खरे असेल तर पिवळा रंग दिसतो. खोटे भेसळयुक्त असेल तर सुरुवातीला लाल आणि नंतर पिवळा रंग दिसून येतो. केशरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून त्याच्या वापराने अनेक आजार बरे करता येतात.
कमी रक्तदाबावर केशर एक प्रभावी उपाय आहे. सर्दी झाल्यास एक ग्लास दूधात चिमुटभर केशर आणि एक चमचा मध टाकून प्यायल्यास आराम पडतो.
त्वचेवरील सुरुकुत्या दूर करण्यासाठी केशराचा लेप रामबाण उपाय आहे.
सांधेदुखीचा आजार असलेल्या लोकांनी केशराचे सेवन अवश्य करावे. यामुळे शरीरातील थकवा दूर होतो तसेच मांसपेशीला आराम मिळतो.
अनिद्रेची समस्या असेल तर केशराच्या उपायाने ही समस्या दूर होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी दुधात केशर टाकून प्यायल्यास अनिद्रेची समस्या दूर होते.

खाद्यतेलावरच चोरट्यांचा डल्ला

हिस्टीरिया सारखा आजार नियंत्रात ठेवण्यासाठी केशर फायदेशीर ठरते.
तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर त्यावर केशराचा लेप लावल्यास लवकर आराम मिळेल.
केशर चंदनासोबत मिसळून कपाळावर लावल्यास डोळे आणि मेंदूला थंडावा मिळतो तसेच शरीरात स्फूर्ती राहते.
डोकेदुखी दूर करण्यासाठी केशराचा उपयोग केला जाऊ शकतो. चंदन आणि केशर इक्त्रीत करून हा लेप डोक्याला लावल्यास लवकर आराम मिळेल.
नाकातून रक्त येत असेल तर यावर उपचारासाठी केशर उपयुक्त ठरते. चंदन आणि केशराचा लेप नाकावर लावल्यास नाकातून येणारे रक्त थांबेल.
महिलांमधील अनियमित मासिक पाळी तसेच पाळी दरम्यान होणारा त्रास केशर सेवन केल्याने कमी होतो. याचबरोबर गर्भाशयावर आलेली सूजही कमी होते.
महिलांमधील उदासिनता कमी करण्यासाठीही केशर उपयोगी आहे. दररोज दोन केशर दूधात टाकून प्यावे.
गर्भवती महिलेने केशर खाल्याने सुदृढ बालक जन्माला येते. बाळाची कांती उजळ होते. कधी-कधी नवजात शिशुचे सर्दीमुळे नाक बंद होते आणि बाळ तोंडाने श्वास घेते अशा वेळी आईच्या दूधात केशर मिसळून ते बाळाच्या डोक्यावर आणि नाकावर लावावे. तसेच थोडं केशर दूधही बाळाला पाजावे.
अपचन, पोटदुखी, गॅस या सारख्या समस्यांवर केशर एक रामबाण औषण आहे.
केशर विविध पद्धतीने उपयोगात आणले जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात कफ होत असेल किंवा हृदयाचा आजार असेल तर केशराचे सेवन फायदेशीर राहीलर्.ंपानमसाल्यात सुगंधासाठी केशराचा वापर केला जातो.
हिवाळ्यात केशरयुक्त दूध प्यायल्याने त्वचा नितळ बनते.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *