पाय दुखणे आणि घरगुती उपाय

आपल्याकडून आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत अनेकांना कमी वयातच पाय दुखण्याची समस्या जाणवू लागते. आजकालच्या पिढीला हा त्रास तरूणपणीच जाणवू लागला आहे. याचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि बदलेल्या खाण्याच्या सवयी यामध्येही दडलेले आहे. तासंतास कामामुळे एका ठिकाणी बसून राहणे, एसीमध्ये जास्त वेळ असणे यासारख्या गोष्टींमुळे ही पायाचं दुखणं जाणवू लागलं आहे.
पायाचं दुखणं म्हणजे काय?
आपले पाय हे हाडं, लिगामेंट्स, टेंडन्स आणि स्नायूपासून बनलेले असतात. या चारही घटकांनी योग्य रितीने काम न केल्यास पाय दुखू शकतात. जेव्हा आपण उभे राहतो किंवा चालतो तेव्हा आपल्या पायांवर दबाव पडतो. ज्यामुळे पाय दुखणंही कॉमन गोष्ट आहे.
पाय दुखण्याची लक्षणं
पायाच्या एक किंवा अधिक भागात दुखू लागल्यास किंवा त्रास होऊ लागल्यास पायाचं दुखणं असं म्हटलं जातं. पायाच्या दुखण्यात खालील गोष्टींचाही समावेश होतो.- पायाची बोट दुखणं.- टाचा दुखणं,- तळव्याचं हाड किंवा पायाच्या पंज्याचं हाड दुखणं,- तळवे दुखणं हे पायाचं दुखणं कमी किंवा अधिक असू शकतं. एखाद्या दिवशी जास्त वेळ उभं राहिल्यानेही पाय दुखू शकतात.
पाय दुखण्याची अनेक कारण असू शकतात. स्नायू आखडणे, स्नायूंचा थकवा, जास्त चालणे, जास्त व्यायाम, स्ट्रेस, ब्लड क्लॉटींगमुळे गाठी होणं, गुडघे,हिप्स आणि पायांमध्ये योग्यरीतीने रक्तप्रवाह न होणं, पाणी कमी पिणं, एकाच जागी जास्त उभे राहणे, आहारात कॅल्शिअम आणि पॉटेशिअमसारख्या व्हिटॅमीन्सची कमतरता, गंभीर जखम होणं किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा आजार इ. अनेक वेळा शरीरातील हाडं कमकुवत झाल्यानेही पाय दुखण्याची तक्रार जाणवते.

नगररचना विभाग आता एजंटमुक्त होणार

पाय दुखण्यावर उपाय
हॉट अँड कोल्ड थेरपी
हॉट अँड कोल्ड वॉटर थेरेपी पायाच्या दुखण्यावरील एक रामबाण उपाय आहे. गरम पाण्याची ट्रीटमेंट ब्लड फ्लोला प्रोत्साहन देते आणि थंड पाण्याची ट्रीटमेंट सूज कमी करण्यास मदत करते. दोन पाण्याच्या बादल्या घ्या एकामध्ये थंड तर दुसर्‍यामध्ये सहन होईल एवढं गरम पाणी घाला. तुमचे पाय तीन मिनिटं गरम पाण्यात घाला आणि त्यानंतर तीन मिनिटं पाय बाहेर ठेवून 10 सेकंड पुन्हा थंड पाण्याच्या बादलीत घाला. असं 2-3 वेळा करा. पण लक्षात घ्या की, सुरूवात गरम पाण्याने करा आणि शेवट थंड पाण्याने करा. तुमच्या पायाचं दुखणं कमी करण्यासाठी तुम्ही आळीपाळीने 10 मिनिटं गरम आणि थंड पाण्याच्या पॅकचा शेकही घेऊ शकता.
सैंधव मीठ
सैंधव मीठ हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे. जो पायाच्या दुखण्यावर तुम्हाला तत्काळ आराम मिळवून देतो. गरम पाणी एका टबमध्ये घ्या आणि त्यात 2-3 चमचे सैंधव मीठ घाला. या पाण्यात तुमचे पाय 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवा. हा उपाय केल्यानंतर पाय कोरडे पडू नयेत म्हणून मॉईश्चराईजर नक्की लावा.

 

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *