शेतीच्या वादातून धाकट्याचा घेतला जीव
नाशिक : वार्ताहर
शेतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात टिकाव टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काल जलालपूर शिवारात घडला.
जलालपूर शिवारातील गट नं. 60 वरून सन 2015 पासून भावांमध्ये वाद सुरू होते. त्याची परिणती काल खूनामध्ये झाली.या प्रकरणी दोघा पिता पुत्राला अटक करण्यात आली.
संशयीत श्रीहरी कोंडाजी शेळके, जयदीप श्रीहरी शेळके असे अटक केलेल्या पिता पुत्राचे नावे आहेत. तर बळवंत कोंडाजी शेळके (वय 57 ) मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि अक्षय शेळके (रा.यशंवतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जलालपूर येथे वडिलोपार्जित शेती आहे. मोठा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके (60 ) हे अनेक वर्षापासून शेती करतात. मृत बळवंत शेळके आणि त्यांचे भाऊ कुटूंबियासह शेतावर गेले होते.
मोठा भाऊ संशयित श्रीहरी याने दोघा भावांना शेती करण्यास मज्जाव केला. तिन्ही भावांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संशयित श्रीहरी आणि त्याचा मुलगा जयदीप तसेच पत्नी सुमन यांनी बळवंत शेळके यांच्यावर हल्ला केला. एकाने बळवंत यांच्या डोक्यात टिकाव मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचा मुलगा अक्षय आणि भावाने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…