मुंबई महापालिकेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली असून, घोडामैदान समोर आले आहे. निवडणुकीची रंगतसुद्धा रंगली आहे. त्यामुळे काही राजकीय पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी मुंबईच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून मुस्लिम समाजाला खूश करण्याची खेळी खेळत आहेत. त्यांच्यामध्ये मुस्लिम समाजाचा अनुनय आणि लांगुलचालन करण्याची स्पर्धा सुरू झाली असल्याचे दिसत आहे. या स्पर्धेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनासुद्धा मागे नाही.
तामिळनाडूतील हिंदू मंदिरामधील पारंपरिक दीपोत्सवाच्या न्यायालयीन निकालावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तामिळनाडूमधील दीपोत्सव घटनेवर घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे शिवसेना उबाठा गटाचा हिंदुत्वविरोधी चेहरा पुन्हा उघड झालेला दिसत आहे. उबाठा शिवसेना गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी न्या. स्वामिनाथन यांच्या विरोधातील महाअभियोग पत्रावर स्वाक्षरी करून आपली हिंदुत्वविरोधी भूमिका प्रदर्शित केली आहे. पण त्यास वेळेस भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी यांनी उबाठा शिवसेनेचा हिंदुत्वविरोधी मुखवटा मुंबईकरांच्या समोर आणून प्रखर शब्दांत निषेध आणि विरोध करून त्यांचे वाभाडे काढले आहेत. सोबतच तामिळनाडूमधील हिंदू मंदिरातील दीपोत्सव परंपरेला आपल्या मुंबईचा महाराष्ट्रातील खासदार का विरोध करतो? असा सवाल उपस्थित केला आहे, तसेच भविष्यात तामिळनाडूप्रमाणे मुंबईत हिंदू समाजाच्या प्रथा-परंपरांवर मुस्लिमांनी आक्षेप घेतल्यास हिंदू प्रथा-परंपराना विरोध केला जाईल तर नाही ना? अशी चर्चा मुंबईकर करीत आहेत.
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव का आणला गेला, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या एका न्यायिक निर्णयात त्यांनी तामिळनाडूमधील तिरुप्परनकुंद्रमच्या पहाडावरील हिंदू मंदिरावर कार्तिक महिन्यात पारंपरिक दीप (दिवा) लावण्याची प्रथा आहे.
मंदिराशेजारी मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ असल्याने स्टॅलिन सरकारने दीपोत्सवास परवानगी दिली नाही, मज्जाव केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आणि न्या. स्वामिनाथन यांनी दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय दिला आहे. मुस्लिम धार्मिक स्थळाजवळ असलेल्या मंदिरावर पारंपरिक दिवा लावण्याच्या निर्णयामुळे तामिळनाडूमध्ये धार्मिक संवेदनशीलता आणि राज्य सरकारसोबत तणाव निर्माण झाला असल्याचा कांगावा आणि निरर्थक मुद्दा पुढे करण्यात आला व त्याचे पडसाद संसदेमध्ये उमटले. शंभरच्या वर खासदारांनी संसदेत न्या. स्वामिनाथन यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी करून प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. तामिळनाडूच्या घटनेमध्ये न्या. स्वामिनाथन यांच्याविरुद्ध सादर झालेल्या महाभियोग प्रस्तावात मुंबईमधील खासदारांनी हिंदुत्वविरोधी भूमिका घेण्याची काय आवश्यकता आहे? असा प्रश्न मुंबईकर उपस्थित करत आहेत. मुंबईच्या खासदाराने तीच भूमिका जम्मू-काश्मीरमधील हजरतबल दरगाहमध्ये राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाची नासधूसप्रकरणी का घेतली नव्हती? किंवा तेव्हा त्या घटनेचा विरोध का केला नाही? तेव्हा त्यांनी आपलं तोंड का उघडलं नव्हतं? दिनांक 3 सप्टेंबर 2025 ला श्रीनगरच्या हजरतबल दरगाह परिसरात वक्फ बोर्डाच्या शिलालेखावर राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाची शिला अंकित होती. ईद-ए-मिलादच्या दिवशी अशोक स्तंभ चिन्ह असलेल्या शिलालेखावर काही लोकांनी दगडांनी मारा करून तोडफोड केली. त्यावेळेस मुंबईसह संपूर्ण देशातून राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक चिन्हाच्या अपमानप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते, पण संविधान बचावसाठी रात्रंदिवस गळा काढणार्या पाखंडी टोळ्यांचा आवाज कुठेच निघाला नाही. सर्व मूग गिळून गप्प बसले होते.
देशात संविधान आणि कायद्याचे राज्य असल्यामुळे वक्फ बोर्डाच्या शिलालेखावरील राष्ट्रीय प्रतीकाची तोडफोड दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईलच; परंतु संविधानाची प्रत हातात घेऊन फिरणारे नेतेमंडळी गप्प का होती? संविधान आणि राष्ट्रीय प्रतीकाविषयी कळवळा व्यक्त करणारी नकली गँगचे तोंड शिवलं होतं का? देशातील एखादा घटनेचा निषेध किंवा विरोध व्यक्त करण्याचा किंवा मोर्चे काढण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला भारतीय संविधानाने दिला आहे. पण राजकीय फायद्यासाठी दुटप्पीपणा करणे कितपत योग्य आहे? तामिळनाडूसारख्या न्यायिक घटनांचा विरोध करण्यासाठी बिळामधून पटापट बाहेर पडतात? हा दुटप्पीपणा लक्षात घेतला पाहिजे.
श्रीनगरमधील हजरत बल दर्गामध्ये राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभाचा अपमानप्रकरणी महाराष्ट्रातील कोणत्याही खासदाराने साधा निषेध व्यक्त केलेला नव्हता. मात्र, तामिळनाडू घटनेत हिंदूविरोधी भूमिका घेऊन न्या. स्वामिनाथन यांच्या विरोधात घेतलेल्या महाअभियोग प्रस्ताववर स्वाक्षरी करणे म्हणजे सरळसरळ मुस्लिम समाजाचे लांगुलचालन आणि हिंदुत्वविरोधी भूमिका घेण्याचा प्रकार म्हणावा लागेल आणि ही भूमिका कितपत योग्य आहे, याचा विचार मुंबईकरांनी करणे आवश्यक आहे.
कारण तामिळनाडू मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यास विरोध करणारी दुटप्पी मंडळी मुंबईतसुद्धा हिंदुत्वविरोधी भूमिका घेण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत. याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेवटी श्रीनगरमधील राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाच्या नासधूसप्रकरणी गप्प असलेली दुटप्पी मंडळी तामिळनाडू मंदिरातील दीपोत्सव परंपरेचा विरोध का करीत आहेत?
Satam's firm stand on Tamil Nadu Deepotsav protest
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…