सत्वपरीक्षा पक्षांची अन् जनतेचीही!

प्रतिबिंब : देवयानी सोनार

 

 

 

 

 

 

मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. काल सायंकाळी (दि.18) प्रचारांच्या तोफा थंडावल्या. गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकचे वातावरण निवडणूकमय झाले होते. मविआचा उमेदवार लवकर जाहीर झाला. त्यातुलनेत महायुतीचा घोळ शेवटपर्यंत चालला. धर्मसत्ता सोडून राजसत्ता खुणावणार्‍या साधुमहंतांनीही राजकीय आखाड्यात उडी घेतली. जाहीर प्रचार थांबली असला तरी आता मतदानाच्या दिवसापर्यंत छुपा प्रचार चालणार आहे.

 

 

त्र्यंबकला मध्यरात्री कार पेटवली

 

 

 

मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी  सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. सोशल मीडियावरून अमुक उमेदवारालाच मतदान करा, असे संदेश व्हायरल झाले. निवडणूक म्हटली की, आश्वासने आलीच. आजवर नाशिकच्या विकासासाठी अनेक नेत्यांनी आश्वासनांची गाजरे दाखविली. प्रत्यक्षात विकास किती झाला? हे नाशिककर उघड्या डोळ्यांनी पहातच आहेत.

 

 

अन् माळवाडीकरांचा मतदान बहिष्कार निर्णय मागे आजी – माजी सरपंच, ग्रामस्थांचा भारती पवार यांना पाठिंबा

 

 

 

 

 

मागील महापालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक विधानामुळे नाशिक मनपावर भाजपाची सत्ता आली. तत्पूर्वी मनसेची सत्ता शहरात होती. मनसेने आपल्या सत्ता काळात अनेक उपक्रम राबविले. परंतु त्यांना ब्रॅण्डिंग करता न आल्याने मनसेला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले.

 

 

नांदगावला एसटी बस- अल्टो कार अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्युमुखी

 

 

 

 

निवडणूक कोणतीही असो नाशिकला केवळ गाजर दाखवले जाते. यंदाच्या निवडणुकीत नागरिकांनीही कोणत्या एका पक्षाची बाजू न घेता तटस्थपणे भूमिका घेत नाशिकच्या विकासासाठी आतापर्यतच्या राजकीय नेत्यांनी काय केले याचे आत्मचिंतन करुन योग्य उमेदवार निवडण्याची गरज आहे.

नाशिकची जनता सहृदयी, भावनेला महत्व देत निर्णय घेणारी असल्याचे आतापर्यत सिद्ध झाले आहे. परंतु नाशिककरांच्या भावनांशी खेळत राजकिय नेत्यांनी केवळ आपली पोळी भाजून घेतली आहे.

 

नांदगावला एसटी बस- अल्टो कार अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्युमुखी

 

राजकीय सत्तासंघर्षात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी झाले आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत होणार्‍या या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या अस्तित्वाची लढाई आहे. लोकसभा निवडणुकीतील यश अपयशावर पुढे होऊ घातलेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.
नाशिकला पोषक वातावरण असूनही विविध घोषणांचा पाऊस पाडत केवळ गाजर दाखविले जात असल्याचे आतापर्यत सिद्ध झाले आहे.

 

 

 

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

 

 

 

 

 

 

नाशिक,कृषीप्रधान जिल्हा आहे.मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.द्राक्ष,डाळिंब,फळभाज्या निर्यात केले जातात. नाशिकनगरी मंत्रभूमी ते यंत्रभूमी आहे. इथले वातावरण,कनेक्टीव्हिटी,जागा.पाणी,पायाभुत सुविधा,उद्योग आदीं पोषक वातावरण आहे.परंतु विकास करण्यासाठी पुरेसा वाव असतांनाही युवावर्गाला नोकरीनिमित्त पुणे,मुंबई,बंगळुरू येथे जावे लागते. नाशिकमध्ये सर्वच दृष्टीने वातावरण चांगले असूनही इथले पॅकेजेस कमी असल्याने तरुणाई दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर करीत आहे.

 

 

देशासाठी निष्काम भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करा

 

आल्हाददायक वातावरण असल्याने गेल्या काही वर्षात मुंबई पुणेकरांनी सेकंडहोम म्हणून नाशिकला पसंती दिली आहे.कसमादे पट्यातील युवक सातपूर,अंबड,सिन्नर एमआयडीसीत रोजगारासाठी लोंढेच्या लोंढे येत आहेत.त्यामुळे शहरावर अतिरिक्त ताण पडला आहे.त्यामुळे शहरवासीयांची पाण्याची गरज वाढली आहे. त्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 

 

 

निवडणुकीत पैशाचा वापर करण्यासाठी वाय,झेड, सिक्युरिटी ,ॲम्बुलन्स, टँकर आदींचा वापर, आमदार रोहित पवार यांचा आरोप

 

 

 

 

 

राजकारण्यांनी नाशिकच्या विकासासाठी उद्योग आणणे क्रमप्राप्त आहे परंतु उद्योग आल्यास कसे नुकसानदायक ठरेल,श्रेयवादाची लढाई आदी कारणांमुळे आपसातच ताळमेळ न साधल्याने मोठा उद्योग आणण्यास कमी पडले आहेत.
नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो जगभरातून लोक नाशिकला येतात त्यांच्यासाठी सोयीसुविधा,आपत्तीव्यवस्थापन,आरोग्य आदी सोयीसुविधांमध्येही अभाव दिसून येतो.

 

लाच लुचपतच्या गळाला बडा मासा,,,पुरातत्वच्या महिला सहायक संचालिका यांच्यासह संचालक दीड लाखांची लाच घेताना जाळ्यात

 

गरीब बिचारी कुणीही हाका कुणीही या आणि फायदा करून घ्या(जनतेचा की स्वतःचा?)अशीच अवस्था राजकीय पक्षांनी नाशिकची केलेली आहे. त्यामुळे जनता सब जानती है, हे  निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *