पुरातत्वच्या महिला सहायक संचालिका सह संचालक दीड लाखांची लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे (41, रा. फ्लॅट no 17, अनमोल नयनतारा, राणेंनागर) आणि संचालक तेजस मदन गर्गे, रा.मुंबई यांना तब्बल दीड लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांना कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र लागत होते. त्यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाकडे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी आरती आले यांनी दिनांक 6 मे रोजी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती, ही लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. आरती आले यांनी तेजस गर्गे यांना तुमच्या हीश्याचे पैसे कोणाकडे देऊ असे विचारले होते, गर्गे यांनीही लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती, त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलीस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, सहायक निरीक्षक सुवर्णा हंडोरे ,हवालदार सचिन गोसावी, अविनाश पवार यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.