स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात काय हलवतो, पाय काय हलवतो, कुठेही बघतो, असंबद्ध बडबडतो आणि विनाकारण उगाचच हसतो… मी नेहमी बघते त्याला…तो असाच करत असतो वेड्यासारखे…..रश्मी आईला सारखे असे त्या मुलाबद्दल प्रश्न विचारत होती. कारण त्या मुलाला ती रोज बघत होती… रश्मी आणी तिचे कुटुंब नव्यानेच ज्या बिल्डिंगमध्ये राहायला आलेत तिथेच ह्यांच्या समोरच्या घरात हा मुलगा आपल्या आईबरोबर राहत होता. आनंद हा स्वमग्न (ऑटिझम) असलेला मुलगा…
आज भारतात सुमारे 68 मुलांमध्ये एक मुलगा हा ऑटिझमचा असतो. इतके हे प्रमाण वाढले आहे. फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात ऑटिझमचे प्रमाण वाढलेले दिसते. नेमकी कारणे काय याविषयी संशोधने सुरूच आहेत, तरीपण आजच्या तरुण पिढीची चुकीची लाइफस्टाइल, लहान मुलांमद्ये वाढलेला स्क्रीन टाइम, घरात आपापसांत कमी संवाद अशी ढोबळ कारणे यामागे आहेत.
2 एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक पातळीवर स्वमग्नतेविषयी जनजागृती केली जाते व ती गरजेचीही आहे. आज ऑटिझमविषयी फारशी कोणाला माहिती नाही. स्वमग्न मूल समोर आले की, त्याला वेडा, पागल, विचित्र, मतिमंद असे लोकं समजतात… नव्हे, यांपैकी एक टायटल देऊन मोकळे होतात.. पण यात स्वमग्न मुलांचा काय दोष? त्यांनी कितीतरी गोष्टी गमावल्या असतात. ऑटिझमची थोडक्यात आपण लक्षणे बघूया…
1. सामाजिक लक्षणे
इतर मुलांबरोबर खेळण्याची कमी आवड, कोणाशी मैत्री न करणे, डोळ्यांना डोळे मिळवून न बोलणे, नावाने हाक मारली तरी नावाला प्रतिसाद न देणे, भावना (आनंद, दुःख) व्यक्त करण्यात अडचण, एकटेपण आवडणे
2. संवाद लक्षणे
उशिरा बोलायला सुरुवात करणे, काही मुले अजिबात बोलत नाहीत, एकाच शब्दाचा किंवा वाक्याचा वारंवार वापर करणे, संवाद करताना योग्य शब्द वापरण्यात अडचण येणे, इशारे वापरणे किंवा हातवारे करून संवाद साधणे.
3. वर्तन लक्षणे
एकाच कृतीची पुनरावृत्ती (उदा. हात हलवणे, फिरणे) ठरलेल्या routine मध्ये बदल झाला तर त्रास होणे. विशिष्ट गोष्टींमध्ये खूप जास्त रस किंवा एखाद्या वस्तुचेobsession  खेळण्यांशी वेगळ्या, unusual प्रकारे खेळणे.
4. Sensory Issues
मोठ्या आवाजाचा जास्त त्रास होणे, प्रकाश, वास किंवा स्पर्शाबाबत जास्त किंवा कमी प्रतिक्रिया काही कपडे/अन्न सहन न होणे.
5. शिकण्यातील अडचणी  : नवीन गोष्टी समजायला वेळ लागणे, लक्ष केंद्रीत ठेवण्यात अडचण, सूचना समजण्यात अडथळे
लक्षात ठेवण्यासारखे :
प्रत्येक मुलामध्ये लक्षणे वेगवेगळी असू शकतात. काही मुलांमध्ये कमी, काहींमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. लवकर ओळख आणि ळपींर्शीींशपींळेप खूप महत्त्वाचे असते. शीघ्र हस्तक्षेप करणे खुप गरजेचे असते. याअंतर्गत ऑक्युपेशन थेरपी, स्पिचथेरपी, फिजिओथेरपी व सगळ्यात महत्त्वाचे बिव्हेवियर थेरपी व कुटुंब समुपदेशन करणे खूप आवश्यक असते.
या सगळ्यांमुळे मुलामध्ये फरक दिसतो,. तो थोडा सोशल होतो, संवाद साधायला शिकतो, आपल्या भावना व्यक्त करायला शिकतो, त्याची चिडचिड व आक्रमकता कमी व्हायला लागते… व तो नाती प्रस्थापित करणे, नाती जपणे हेदेखील शिकतो.. याच्याच जोडीला तो अभ्यासही शिकतो, बुद्धिमत्ता खूप चांगली असेल तर तो भरपूर शिकतो (सर्वसामान्य मुलांप्रमाणेच) गरज आहे ती स्वमग्न मुलांना समजून घेण्याची, त्यांना मदतीचा हात देण्याची व त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची.

self-absorption

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *