नाशिक

ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे उद्या होणार आगमन

नाशिक ः प्रतिनिधी
गणरायापाठोपाठ गौराईंचे येत्या रविवारी (दि. 31) सोनपावलांनी आगमन होणार आहे. गौरीपूजन दि. 1 सप्टेंबरला होणार आहे. विसर्जन 2 तारखेला होईल. अनुराधा नक्षत्रावर गौराईंचे पूजन केले जाते. तीन दिवसांच्या माहेरपणासाठी महालक्ष्मी पूजन केले जाणार आहे. गौरींचेे आगमन, भोजन आणि निरोप दिला जाणार आहे.
गौरीपूजनाचा उत्साह घराघरांत दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून गौरींच्या आगमनासाठी महिलावर्गासह कुटुंबीयांची तयारी सुरू आहे.
माहेरपणासाठी आलेल्या ज्येष्ठा, कनिष्ठा गौरींच्या पूजनात कोणतीच कमतरता राहू नये यासाठी महिला आणि घरातील पुरुष मंडळींसह बच्चेकंपनीही खारीचा वाटा उचलताना दिसत आहेत. महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी भाजीपाला, फळे, फुलेे खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. ज्येष्ठा, कनिष्ठांच्या सरबराईसाठी विविध प्रकारचा फराळ,
फळे, नैवेद्यासाठी तिन्ही दिवसांच्या वेगवेगळ्या भाज्या आदींचे नियोजन केले जात आहे. आवाहनाच्या आदल्या दिवशी सर्व तयारी पूर्ण करण्यात येईल. माहेरवाशिणींप्रमाणे घराघरांत आज गौराईचे स्वागत केले जाणार आहे. प्रत्येकाच्या परंपरेनुसार कोणाकडे उभ्या, बसलेल्या किंवा खड्याच्याही गौरी पूजल्या जातात. स्थापना, विधिवत पूजन आणि नैवेद्य, आरती केली जाते. पहिल्या दिवशी साधा नैवेद्य, दुसर्‍या दिवशी पुरणपोळी आणि सोळा भाज्यांचा नैवेद्य, तर निरोपाच्या दिवशी आंबिल कथिलाचा नैवेद्य दाखविला जातो.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

12 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

12 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

12 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

12 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago