नाशिक

तळपाडा येथे तीव्र पाणी टंचाई

तळपाडा ( मधला) येथे तीव्र पाणी टंचाई,  महिलांकडून कायम स्वरुपी नळपाणी पुरवठाची मागणी

 

 

सुरगाणा:   मधला तळपाडा (सुरगाणा) पाणी टंचाई  गंभीर सुरगाणा   तालूक्यातील मधला तळपाडा  येथे स्वातंत्र्याची ७५ वर्षे होऊन देखील कायम स्वरुपी  पिण्याच्या पाणीची सुविधा दिली नाही. अनेक वर्षे नागरिकांनी  ग्रामपंचायतीला अर्ज  विनंती करून प्रत्यक्ष ग्रामस्थांनी वारंवार सांगून देखील कोणतीही समस्या सोडवली नाही . त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यापासून  पिण्याचा पाणी प्रश्न  गंभीर  बनला असून  महिलांना रात्रभर पिण्याच्या पाण्यासाठी एक  किलोमीटर पायपीट करत रात्रभर  बसून हंडाभर पाण्यासाठी  नंबर लावून   बसावे लागत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी नळपाणी पुरवठा  योजनेत विहीर न  बांधता   जुन्या  हातपंप मध्येच जलपरी बसवून ही तात्पुरती पाणी सुविधा दिली होती. मात्र हा हातपंप आटत असल्याने पिण्याचे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सदर  हातपंप मध्ये टाकलेली जलपरी ही बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महिलांचे खूपच  हाल होत आहेत.  ग्रामपंचायत सरपंच ,स्थानिक सदस्य  हेच संगनमताने  ठेकेदार बनून योजना  राबवित असतात . सरपंचाने आम्हाला दोन वर्षापासून विहीर मंजूर आहे लवकरच खोदण्यात येईल असे आश्वासन दिले होते निवडणुकांनंतर बांधण्यात येईल असे सांगितले जाते मात्र अद्याप कोणतीही मदतीला आलेले नाही भदर   ग्रामपंचायत अंतर्गत  येणाऱ्या ग्रामपंचायतीची  २०  वर्षापासून आर्थिक योजनांची चौकशी करून   खर्च झालेल्या निधीची पडताळणी करून योग्य  न्याय मिळावा हीच  मागणी करीत आहोत . सदर योजना  राबविणाऱ्यानां अधिकारी व कार्यकर्त्यांचा आधार मिळत असतो म्हणून कोट्यवधी रुपयांची योजना  राबवत लूट करत जनतेची फसवणूक करत आहेत.  त्यामुळे मात्र आदिवासी महिला व नागरिकांचे हाल होत आहेत.  लवकर  पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी महिला व ग्रामस्थांनी केली आहे. तळपाडा ग्रामस्थांना पिण्याचे पाणी  सोय कायम स्वरुपी लवकर उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी    भारती महाले,  रंजना देशमुख,  हिराबाई महाले, यशोदाबाई महाले, गिता देशमुख,  सुंदरबाई महाले, भारती महाले, ताराबाई महाले,  भास्कर महाले,  शंकर महाले,  बापू देशमुख , विजय महाले, देवेंद्र  देशमुख, भागवत गावीत, रमेश देशमुख, विठ्ठल महाले, दिनकर देशमुख आदी ग्रामस्थांनी केली आहे. सदर   योजना जिल्हाधिकारी, तहसिलदार,  जिल्हा परिषद अध्यक्ष, वरिष्ठ अधिकारी आणि आमदारांनी लक्ष्य देवून चौकशी करण्यात यावी आणि  कायम स्वरुपी सुविधा मिळवून द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago