महाराष्ट्र

राज्यातील हॉटेल, उपाहारगृहांना 20 टक्के सिलिंडर पुरवठा होणार

भुजबळ : व्यावसायिकांना मोठा दिलासा

मुंबई :
राज्यातील हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन, अन्नप्रक्रिया आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यापारी एलपीजी चा अतिरिक्त 20 टक्के पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी 21 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या सूचनांनुसार, यापूर्वी राज्याला 30 टक्के एलपीजी वाटप मंजूर होते. आता 23 मार्च 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त 20 टक्के वाटप वाढविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण गॅस पुरवठा हा पूर्वीच्या संकटपूर्व पातळीच्या सुमारे 50 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. या वाढीव वाटपात हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्नप्रक्रिया उद्योग आणि दुग्धव्यवसाय यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालविण्यात येणार्‍या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स तसेच स्थलांतरित मजुरांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, या निर्णयामुळे व्यापारी एलपीजीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व खाद्य व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळेल. मात्र, गॅस पुरवठा मिळवण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणी करणे तसेच पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणे आवश्यक राहणार आहे.
दरम्यान, राज्यातील केरोसिन वितरणाबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रलंबित परवाने आपोआप नूतनीकरण झाल्याचे मानण्यात येणार असून, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच वारसांच्या नावे परवाने तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या गावांमध्ये किरकोळ केरोसिन परवानाधारक उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी रास्तभाव दुकान चालविणार्‍या दुकानदारांना किरकोळ केरोसिन परवानाधारक म्हणून मान्यता देऊन परवाना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 20 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासनपत्रान्वये या संदर्भातील कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व निर्णयांमुळे राज्यातील इंधन पुरवठा व्यवस्थेला काही प्रमाणात गती मिळण्याची अपेक्षा असून, विशेषतः खाद्यव्यवसाय आणि लघुउद्योगांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सध्या हे अतिरिक्त वाटप तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्यात आले आहे. पुढील काही काळ परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर नवीन अधिसूचना जारी केली जाईल. या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला असून, ऐन व्यवसायाच्या काळात गॅस टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

 

 

20 percent cylinder supply to hotels and restaurants in the state

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

27 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

34 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

40 minutes ago