शहापूरजवळ क्रेन कोसळून १७ मृत्यू तर ३ जखमी
शहापूर: अफजल पठाण
शहापूर जवळ क्रेन कोसळून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात होऊन १७ जण मृत तर ३ जण जखमी झाल्याची घटना घडली. शहापूरजवळ समृध्दी महामार्गाचे काम सुरू असता या ठिकाणी क्रेन कोसळून दुर्दैवाने १७ कामगार मृत्युमुखी तर ३ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. सिंगापूर एस एन कंपनीचे हे लॉन आहे. याच लॉन च्या माध्यामतून आतापर्यंत ९४ पुलाचे काम पूर्ण करण्यात असून १६ स्पेन चे काम बाकी आहे. रूटीन नुसार सुरू होते.
—————————-
रात्री एक वाजता फोन आला. त्यानुसार तातडीने निघालो. अपघातातील जखमींना शहापूर आणि ठाण्याच्या हॉस्पिटलला दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मृत्यूतांचे पार्थिव त्यांच्या गावी पाठविण्याचे काम केले जाईल. सर्व यंत्रणा काम करत आहेत, सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. शोध कार्य अजूनही सुरू आहे. ही एक तांत्रिक दुर्घटना असून रस्त्यावरच्या अपघाताचा यात काही संबंध नाही. समृध्दी महामार्गावरील जे अपघात आहेत त्याबाबत सभागृहात सविस्तर चर्चा झालेली आहे. त्या अपघातातील जे शोध घेतले त्यात मानवी चुकांमुळे अपघात झालेले आहेत. मात्र त्या अपघातांना या सोबत जोडू नये. हा तांत्रिक अपघात असला तरी देखील याची चौकशी करण्यात येईल.
दादा भुसे, मंत्री
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…