राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे

नाशिकरोड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून, शशिकांत शिंदे यांची नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे पाटील यांनी  प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले.गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती. चार दिवसांपासून या संदर्भातील चर्चा सुरू होत्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक झाली. जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदीसह पक्षाची मंडळी उपस्थित होते.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगावचे असलेले शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात,

1999 मधून जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे पहिल्यांदा म्हणून विजयी झाले, राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी ही शशिकांत शिंदे यांनी सांभाळले असून सध्या विधान परिषदेतील मुख्य प्रतोद म्हणून देखील त्यांच्याकडे जबाबदारी आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागलात्यानंतर 2024 मध्ये सातारा लोकसभेची निवडणूक ही शशिकांत शिंदे यांनी लढवली मात्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून ते पराभूत झाले

Bhagwat Udavant

Recent Posts

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

13 hours ago

दहापट पैसे कमवायला गेली…खेळण्याचे पैसे घरी घेऊन आली

शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…

2 days ago

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला   शहापूर :  साजिद शेख एका…

2 days ago

आलिशान कारच्या काळ्या काचाआड दडले होते काय? पोलिसांनाही बसला धक्का!

अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…

3 days ago

उज्ज्वल निकम होणार खासदार

उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…

3 days ago

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी…

4 days ago