गणेशोत्सवातही अंधार; वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गणेशभक्तांचा सहभाग
लासलगाव : वार्ताहर
सणासुदीचा काळ आणि गणरायाच्या आगमनाचा उत्साह असतानाही ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि गणेशभक्तांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सायंकाळच्या वेळी अंधारात पूजा-अर्चा करावी लागत असून, परिसरात बिबट्याचा वावर असल्याने अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने लासलगाव येथील महावितरण कार्यालयाला घेराव घालून अधिकार्यांना जाब विचारण्यात आला.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवा पाटील सुरासे आणि उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निफाड तालुक्यातील 46 गावांमधील शिवसैनिक, शेतकरी तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळणे आवश्यक असताना वारंवार वीज खंडित होत असल्याने गणेशभक्तांना पूजा-अर्चा करताना अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शिवा पाटील सुराशे, तालुकाप्रमुख निवृती जगताप, उपजिल्हाप्रमुख उत्तम वाघ, शिरवाडे सरपंच डॉ. श्रीकांत आवारे, पाचोरे सरपंच गणेश डोमाडे, मरळगोई सरपंच निवृत्ती जगताप, संतोष पानगव्हाणे, बद्रिनाथ लोहारकर, ज्ञानेश्वर तासकर, आत्माराम दरेकर, शंकरराव शिंदे, सतीश गांगुर्डे, बापूसाहेब डुंबरे, रवींद्र पाचोरकर, वसंत खुर्दे, सचिन पवार, रेवन्नाथ शिंदे, संजय जाधव, बापूसाहेब भोसले, प्रवीण नाईक यांच्यासह शिवसैनिक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्या एकाही अधिकार्याला ग्रामीण भागात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा शिवा पाटील सुरासे व निवृत्ती जगताप यांनी यावेळी दिला. यावेळी लासलगाव महावितरणचे अधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी तातडीने याबाबत वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सागर कोते यांनी केलेल्या विनंतीला मान देत आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
Shiv Sena lays siege to the Mahavitaran office.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…