Categories: नाशिक

सरस्वती नदी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

पावसाळ्यापूर्वी नदीपात्र मोकळे करण्यासाठी प्रशासन सज्ज

सिन्नर : प्रतिनिधी
शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणार्‍या सरस्वती नदीच्या स्वच्छता मोहिमेला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार प्रारंभ करण्यात आला असून, पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील गाळ, गवत आणि पाणवेली हटवून नदीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. तहसील प्रशासन आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
कधीकाळी सिन्नर शहराचे वैभव असलेली सरस्वती नदी गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत होती. नदीपात्रात वाढलेले गवत, कचरा यामुळे नदीला ओंगळवाणे रूप आले होते. शहरवासीयांकडून नदीच्या स्वच्छतेची वारंवार मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आमदार माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी सरस्वती नदी परिसराची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी नदीची स्वच्छता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नगरपालिका आणि तहसील प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने या कामाला गती दिल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, 2022 मध्ये सरस्वती नदीला आलेल्या
महापुरामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नदीकाठावरील अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली होती. नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते तसेच अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळ्यापूर्वी नदीपात्र मोकळे करून संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी स्वच्छता मोहिमेसाठी तीन पोकलेन मशिन उपलब्ध करून दिल्या असून, नगरपरिषदेकडून मनुष्यबळ तसेच इंधन पुरवठा करण्यात येत आहे. देवी मंदिराच्या पाठीमागील भागातून नदी स्वच्छतेच्या कामास सुरुवात झाली असून, प्राथमिक टप्प्यात नदीतील साचलेले पाणी चर काढून बाहेर सोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, पाणवेली आणि अडथळा निर्माण करणारा कचरा हटविण्याचे काम सुरू आहे.
नदीत वर्षानुवर्षे साचलेला गाळही मोठ्या प्रमाणात उपसण्यात येत असून, तो सुकल्यानंतर त्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, नदी स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, ही मोहीम
नियमितपणे राबवून नदीचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्ती करण्याची
मागणीही नागरिकांकडून होत आहे.

Saraswati River Cleanup Campaign Begins

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago