चार लाखांचा ऐवज लंपास; परिसरात खळबळ
उमराळे बुद्रुक : वार्ताहर
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गालगत असलेले होलसेल विक्रेते बालाजी ट्रेडर्स किराणा दुकानातील अज्ञात व्यक्तीने रात्री 2 वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर वाकवून आतील 500 सिगारेट पाकिटे व सीसीटीव्ही कॅमेरा (बीव्हीआर) असे चार लाख रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्याने उमराळे बुद्रुक परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, उमराळे बुद्रुक-नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या बालाजी ट्रेडर्स किराणा दुकानामध्ये अज्ञात चोरट्याकडून रात्रीच्या सुमारास पाचशे सिगारेट पाकिटे, तीन लाख 50 हजार व सीसीटीव्ही कॅमेरा बीव्हीआर तसेच 50 हजार किमतीचे ऐवज व गल्ल्यात असलेले चिल्लर बारा हजार रुपये चोरून नेले आहे. अज्ञात चोरटे इथून बाहेर निघून गेले असता शुक्रवारी (दि.13) सकाळी बालाजी ट्रेडर्सचे मालक सकाळी राहुल अग्रवाल यांना बालाजी ट्रेडर्स किराणा दुकानाचे शटर मध्यभागी वाकलेले दिसले. त्यांनी त्वरित दूरक्षेत्र औट पोस्ट पोलीस ठाण्याचे पीएसआय किसन काळे, एस. आय. जाधव यांना कळवताच उमराळे बुद्रुक -नाशिक-पेठ महामार्गालगत असलेले बालाजी ट्रेडर्स दुकानाचे शटर वाकलेले तसेच गल्ल्यात असलेले चिल्लर बारा हजार रुपये व सिगारेट पाकिटे यांचा पंचनामा करत फिंगर प्रिंट त्यांना पाचारण केले. दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली उमराळे बुद्रुक औट पोस्टचे काळे, जाधव अधिक तपास करीत आहेत.
सिडको : प्रतिनिधी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि…
सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…