राख्या खरेदीसाठी लाडक्या बहिणींची गर्दी
नाशिक : प्रतिनिधी
बहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन असलेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे काल (रविवार) शहरातील बाजारपेठेत राख्यांच्या खरेदीसाठी लाडक्या बहिणींची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. मेनरोड, शालिमार परिसर गर्दीने ओसंडून वाहत होता. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी
अनुभवायास मिळाली.
रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली आहे. आकर्षक राख्या, भावांसाठी भेटवस्तू, कपडे तसेच मिठाई खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी झाली होती. विविध रंग, आकार आणि आकर्षक सजावटीच्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
यंदा पारंपरिक राख्यांसोबतच कुंदन, मोती, ब्रेसलेट, स्टोन, धार्मिक चिन्हे तसेच विविध आकर्षक डिझाइनच्या राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. बाजारात नव्या प्रकारच्या राख्यांची रेलचेल असून, भावाला आवडणारी राखी निवडण्यासाठी बहिणींकडून विविध दुकानांमध्ये गर्दी केली जात आहे.
राखीसोबत भावासाठी भेटवस्तू देण्याचा ट्रेंडही वाढला आहे. कपडे, पर्स, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती साहित्य आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. विविध दुकानांमध्ये सणानिमित्त सवलती जाहीर करण्यात आल्याने खरेदीला आणखी वेग
आला आहे.
Shopping’s ‘Super Sunday’
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…