द्वारका परिसरात दुकाने, पत्र्याचे शेड हटवले
अतिक्रमण हटाव मोहीम जोमात;
वडाळा गाव: प्रतिनिधी
शहरातील प्रमुख चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हाजी अली सर्कल च्या धर्तीवर आधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत तेथील सर्कल हटवण्यात आले असून, परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम रविवारी (दि. १५ जून) सकाळपासून महापालिकेच्या पथकाने राबवली.
द्वारका चौक ते वडाळा नाका परिसरात रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेली दुकाने, पत्र्याचे शेड्स, अनधिकृत रचनेचे अडथळे हटवण्यात आले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर आळा बसणार असून, सिग्नल यंत्रणेसाठी आवश्यक जागाही मोकळी झाली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले. यात अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पूर्व व सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव, तसेच नाशिक रोड व पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व यंत्रणा सकाळपासून सक्रिय होती.
या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण परिसरात लक्ष ठेवत शांततेत कारवाई पार पाडली.
सिग्नल यंत्रणा बसल्यानंतर द्वारका परिसरातील वाहतूक नियंत्रणात राहील, अपघातांचे प्रमाण कमी होईल
सहा अतिक्रमण गाड्या दोन जेसीपी तीन ट्रॅक्टर एक डंपर पालिकेचे सर्व पथक सकाळी दहा वाजता पोहोचून अकरा वाजता कारवाईला सुरुवात झाली
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…