अमेरिका-इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर जोरदार हवाई हल्ले केल्यानंतर भडकलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली. सोन्या-चांदीचे भाव कडाडले, शेअर बाजार कोसळले, जगभरातील इंधनपुरवठा साखळीवर परिणाम झाला, खनिज तेलाचे दर भडकले आणि गॅसही महागला. या परिणामांचा फटका भारतालाही बसला. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने कोंडी केल्याने इंधनपुरवठा साखळी विस्कळीत झाली. खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराणने ताठर भूमिका घेतली होती. युद्धविराम व्हावा यासाठी कतार आणि पाकिस्तान या देशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला इराणने बोलणी करण्यास नकार दिला होता; परंतु अखेर दोन्ही देश चर्चेस तयार झाले. दि. 8 एप्रिल 2026 रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात पहिला तात्पुरता युद्धविराम झाला. त्यानंतर 17 जून 2026 रोजी दोन्ही देशांमध्ये युद्ध संपुष्टात आणण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षर्या झाल्या. हाच करार (युद्धविराम) संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने युद्धविरामपूर्व परिस्थितीत जग आले आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक नेते या युद्धात मारले गेले. कोणत्याही क्षणी हवाई हल्ले होण्याची शक्यता असल्याने इराणने खामेनी यांच्यावरील अंत्यसंस्कार विधी लांबणीवर टाकला होता. युद्धविरामानंतर इराणने खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली. खामेनी यांच्यावर मशहदमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आठवडाभर चाललेल्या अंत्ययात्रा आणि श्रद्धांजली समारंभांनंतर खामेनींना मशहदमधील इमाम रझा यांच्या पवित्र दर्गा संकुलाजवळ दफन करण्यात आले. हा विधी सुरू असतानाच अमेरिकेने इराणवर हल्ले केले. विशेषतः जेथे अंत्यसंस्कार सुरू होते, त्याच मशहद शहरावर हवाई हल्ले केले. त्यानंतर इराणचे उरलेसुरले नेतृत्वही संपवून टाकू, असा गर्भित इशारा ट्रम्प यांनी दिला. नेतृत्व संपवले तर चर्चा कोणाशी करायची, अशी टिप्पणीही त्यांनी केली, तेव्हाच त्यावरूनच युद्धविराम संपणार असल्याचे संकेत मिळाले होते. अमेरिकेने इराणमधील सुमारे 90 तळांवर गुरुवारी पहाटे नव्याने हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर देत इराणनेही आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या दोन दिवसांच्या हवाई हल्ल्यांंमध्ये किमान 14 जणांचा मृत्यू झाला, तर 78 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांश लष्करी जवान आहेत. दुसरीकडे बहरिन, कुवेत आणि कतारमध्ये झालेल्या नुकसानीची कोणतीही माहिती समोर आली नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणकडून व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केल्याने मध्यपूर्वेतील भू-राजकीय वातावरण अत्यंत स्फोटक बनले आहे. या घोषणेचे जागतिक स्तरावर अत्यंत तीव्र आणि तत्काळ लष्करी व आर्थिक परिणाम दिसले आहेत. ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने (पेंटागॉन) इराणमधील ऐंशीहून अधिक लष्करी तळांवर, हवाई संरक्षण यंत्रणांवर आणि रडार केंद्रांवर क्षेपणास्त्रांंद्वारे भीषण हवाई हल्ले चढवले. या कारवाईला चोख प्रत्युत्तर देत इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) बहरिन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर तब्बल क्षेपणास्त्रे डागली आणि ड्रोन्स डागले. याशिवाय तात्पुरत्या युद्धविरामांतर्गत इराणला मिळालेली तेल विक्रीची विशेष सवलत अमेरिकेने तातडीने रद्द करून पुन्हा कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. नव्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तत्काळ 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, ब्रेंट क्रूड प्रतिबॅरल 78 डॉलरच्या पार पोहोचले. जागतिक बाजारातील या अनिश्चिततेमुळे युरोपियन, आशियाई आणि भारतीय शेअर बाजारांत मोठी घसरण नोंदवली गेली. जगातील सर्वांत महत्त्वाचा तेलपुरवठा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने दावा केल्याने व्यावसायिक सागरी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही परिस्थितीचा फायदा घेत इराणविरुद्ध पूर्णक्षमतेने पुन्हा युद्धात उतरण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या एका घोषणेने आंतरराष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि जागतिक व्यापाराला मोठ्या संकटात ढकलले असून, संपूर्ण जग पुन्हा एकदा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभे राहिले आहे. अमेरिका-इराण यांच्यात 17 जून 2026 रोजी झालेल्या युद्धविराम कराराचे जगभरात स्वागत करण्यात आले होते. युद्धामुळे निर्माण झालेली इंधनटंचाई दूर होईल आणि जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तशी चिन्हेही दिसत होती. कच्चे तेल आणि गॅसचे आंतरराष्ट्रीय दर घसरू लागले होते आणि टंचाई दूर होऊ लागली होती. भारतातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. ही परिस्थिती यापुढे आणखी सुधारेल, अशी अपेक्षा असतानाच युद्धविराम कराराचा भंग होऊ लागला. ट्रम्प यांनी युद्धविराम समाप्त झाल्याचे जाहीर केले. तुर्कीची राजधानी अंकारा येथे झालेल्या नाटो राष्ट्रांच्या शिखर परिषदेत ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याची घोषणा केली. इराणशी आता मला कोणतीही चर्चा करायची नाही, ते आजारी मानसिकतेचे लोक आहेत, असे ट्रम्प म्हणाले. आता पुढे काय, हा गंभीर प्रश्न जगासमोर उभा राहिला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेले युद्ध अधिकच आक्रमक झाले आहे. दरम्यान, इराणने ट्रम्प यांची हत्या करण्याची योजना आखल्याची गुप्त माहिती इस्रायलने अमेरिकेला दिल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या गुप्त माहितीचा वापर करून ट्रम्प यांना आणखी एका हल्ल्यासाठी चिथावले, अशीही चर्चा आहे. एका माहितीमुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध सुरू झाले. इस्रायली गुप्त माहिती अचूक होती की नाही, हे अद्याप अज्ञात आहे, पण काही अमेरिकन अधिकार्यांना अशी चिंता आहे की, ती माहिती केवळ ट्रम्प यांना चिथावणी देण्याचा एक प्रयत्न होता. तसे असले तरी इस्रायल आपल्या योजनेत यशस्वी ठरला. अमेरिकेने आता इराणवरील हल्ले तीव्र केले आहेत. आपल्या जिवाला धोका असल्याचे ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले होते. या पार्श्वभूमीवरच त्यांनी युद्धविराम संपल्याचे जाहीर केले. त्यांची ही घोषणा जगाला पुन्हा संकटात नेणारी ठरली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम मोडल्याने हा संघर्ष लवकर थांबण्याची शक्यता धूसर झाली आहे. अशा स्थितीत भारताने स्वतःच्या देशात तेलसाठे शोधण्याचा प्रयत्न नव्या जोमाने करून पाहायला हवा. त्यात यश मिळाल्यास भारताला मोठा लाभ होईल. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम अखेर अल्पजीवी ठरला. तो तसा ठरणार हे तो झाला तेव्हापासूनच दिसत होते. कारण युद्धविराम यशस्वी होण्यासाठी आणि त्याचे रूपांतर स्थिर शांततेत होण्यासाठी जे विश्वासाचे वातावरण असावे लागते, ते नव्हतेच. त्यामुळे आताच्या घडामोडी फारशा आश्चर्यकारक नाहीत. युद्धविरामाचे काही दिवस चांगले गेल्याने जगाच्या जिवात जीव आला होता. लवकरच तेलव्यवहार सुरळीत होतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील संकट दूर होईल, अशी आशा निर्माण झाली होती. कच्च्या इंधन तेलाचे दर कमी होऊन जवळपास 70 डॉलरवर आले होते आणि पुरवठाही सुरळीत होण्यास प्रारंभ झाला होता. तथापि, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्या तीन तेलवाहू नौकांवर हल्ला केला आणि लगोलग अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याची घोषणा करत इराणमध्ये जोरदार हवाई हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इराणनेही कुवेत आणि बहरिन या देशांतील अमेरिकेच्या सैनिकी तळांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रेेे डागली.
Short-lived ceasefire
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik