आदित्य ठाकरे यांचा नगरसेवकांना आदेश
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना आक्रमकता ठेवा. तुम्ही बोलत राहा, तुमचा अधिकार्यांवर धाक हवा. विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असून, जनतेच्या मनात काय चालले आहे ते ओळखा आणि आपला दबदबा दाखवा, असे निर्देश उद्धवसेनेचे माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनी येथेे दिले.
उद्धवसेनेचे युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिक महापालिकेतील 15 नगरसेवकांच्या कामकाजाचा आढावा रविवारी (दि. 24) घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी, मनपा गटनेते केशव पोरजे, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख प्रथमेश गिते आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, की मनपातील तुमची हजेरी, तुम्ही किती बोललात त्याची पक्षाकडून तपासणी होईल. रिक्तपदे लवकरच भरू. मात्र, जनतेसाठी वेळप्रसंगी आंदोलने करीत तुमचा आवाज बुलंद ठेवा. मान्सूनपूर्व कामांची तपासणी करा, अधिकार्यांना कामाला लावा. लोकांशी सतत संवाद ठेवा. भेटी द्या, जनता दरबार घ्या. तुमच्या प्रभागाची माहिती, उणिवा तोंडपाठ ठेवून त्या सातत्याने मांडण्याचे आवाहन केले.
नाशिकमधील खोदकाम, लोकांच्या अडचणी यावर प्रश्न मांडा. सत्ताधारी असताना मर्यादा असतात, पण आपण विरोधी पक्षात आहोत. सत्ताधारी पक्षातील नगरसेवक स्वत: बोलू शकत नसल्याने काही माहिती देतात, त्याचाही उपयोग करून शासनावर तुटून पडण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. त्यांनी महापालिका सभागृह जनतेच्या समस्या मांडून दणाणून सोडा, असे आदेश आ. ठाकरे यांनी नगरसेवकांना दिले.
उत्तर प्रदेशात वीज आणि पाणी प्रश्नावर आंदोलन झाले असून, तसेच महाराष्ट्रातही होत आहे. पाणी, वीज यांसारख्या प्रश्नांवर आपला आवाज कितीही बंद करण्याचा प्रयत्न झाला तरी लोक पर्याय शोधत आहेत. तुम्ही तयार राहा, असे त्यांनी सांगितले.
कॉक्रोच जनता पार्टीला भाजपा घाबरली
महाराष्ट्रातील मराठमोळ्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ सुरू केली, त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी या पक्षावर निर्बंध आणले. भाजपच्या मनातली ही भीती तुम्ही ओळखा. नाशिकच नव्हे, तर संपूर्ण भारतातील मतदार आणि जनता भारतीय जनता पक्षाला पर्याय शोधत आहे, पण त्यांचे तोंड बंद करण्याचे काम सुरू आहे. हे तुम्ही ओळखायला हवे, असेही आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
Show aggression in the municipality
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…