‘श्री प्रतिष्ठान’ साकारणार स्वर्णगिरी मंदिराचा देखावा

नाशिक : प्रतिनिधी
इंदिरानगर येथील भाजपा प्रणीत श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे यंदा 20 वे वर्ष असून, आजवर मंडळाने एतिहासिक, धार्मिक, सामाजिक देखाव्यांची आणि पुरातन मंदिरांची प्रतिकृती साकारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मागील वर्षी मंडळाने वृंदावन येथील प्रेम मंदिर प्रतिकृती साकारली असता शहरभरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद पहावयास मिळाला होता. या देखाव्यास विविध पारितोषिकेदेखील मिळाली. यंदा मंडळाकडून तेलंगणा राज्यातील स्वर्णगिरी मंदिर (व्यंकटेश्वर स्वामी मंदिर) चा देखावा साकारला जाणार आहे. या देखाव्याचा मंडप पूजन सोेहळा बुधवारी (दि.29) गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येेष्ठ स्वयंसेवक रघुनाथ अप्पा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी देखाव्याच्या मंडप पूजनावेळी भाजप गटनेते तथा मंडळाचे संस्थापक अ‍ॅड. श्याम बडोदे, नवीन नाशिक प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाठ, मा. नगरसेवक सुनील खोडे, नगरसेवक यशवंत निकुळे, प्रकाश नन्नावरे, नगरसेवक भगवान दोंदे, नितीन कुलकर्णी, भगरे गुरुजी, शरद निकम, उत्तम उघाडे, उत्तम सानप, सदानंद पांढुर्लीकर, सुभाष शेवाळे, सदाशिव उगले, धनराज चव्हाण, अशोक धर्माधिकारी, चंद्रकांत पोतदार, विनायक विसपुते, बाळासाहेब केंगे आदी
उपस्थित होते.
या देखाव्यातून सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्व आखाड्यांची, साधू-संतांची संपूर्ण माहितीदेखील याद्वारे दिली जाणार आहे.
स्वर्णगिरी मंदिराची प्रतिकृती 80 बाय 130 फूट असून, उंची 70 फूट असून, 30 फुटांचे महाप्रवेशद्वार साकारण्यात येणार आहे. या मंदिरात 30 बाय 50
फुटाचा पाण्याचा कुंड तयार करून यात व्यंकटेश्वर स्वामी (भगवान विष्णूची शय्याधारी मूर्ती) विराजमान करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या मंदिरात तिरुपती बालाजी, दुसर्‍या मंदिरात श्री गणेश व तिसर्‍या मंदिरात महालक्ष्मी देवी यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. सदरील स्वर्णगिरी मंदिराची प्रतिकृती संपूर्णपणे पर्यावरणपूरक असून, यासाठी बांबू, बल्ली, बॉटम, पट्टी, कपडा यांचा वापर केला जाणार आहे.
यावेळी सुनील गायमुखे, वसंत रत्नपारखी, डेकोरेटर पवन सिंह जमनाबाई बडोदे, शुभांगीताई नांदुर्डीकर, सीताबाई बडोदे, जान्हवी बडोदे तसेच श्री प्रतिष्ठानचे जयवंत टक्के, आशिष दाभोलकर, गोपाळ आव्हाड, भरत शिरसाठ, योगेश रेवगडे, अ‍ॅड. मनीष पाटील, यशवंत जाधव, राम बडोदे, सतीश यादव, किरण पाटील, प्रशांत पाटील, गणेश रत्नपारखी, घनःश्याम बच्छाव, विलास देशमुख, मिलिंद गायकवाड, परेश पाटील, अ‍ॅड.राम नागरे, अनुज आव्हाड, तन्मय आव्हाड, रूपेश शर्मा, अजित शर्मा, राज म्हामुणकर, संजय हेमाडे, सुजित मोरे, अ‍ॅड. शुभम सोनवणे, उदय बडोदे, विशाल बडोदे, अ‍ॅड. अजय बडोदे, अमोल बडोदे, शिवम भदाणे, शुभम पारवे, गोकुळ फड, तेजस वाघ, जेविण मालवीय, नंदलाल फडते, प्रकाश सोनवणे, गौरव चव्हाण, प्रणव झळके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात भव्य-दिव्य आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशोत्स्व काळात विविध स्पर्धा, घरगुती आरास स्पर्धा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नाशिककरांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. -अ‍ॅड. श्याम बडोदे, गटनेते, भाजपा, संस्थापक

 

‘Shree Pratishthan’ to create a replica of the Swarnagiri Temple.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *