नैताळेनगरी सज्ज; देवस्थान ट्रस्टतर्फे महापूजा, रथपूजा
निफाड : विशेष प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास शनिवार(दि. 3 जानेवारी)पासून उत्साहात प्रारंभ होणार आहे. हा यात्रोत्सव 18 जानेवारीपर्यंत अखंड सुरू राहणार आहे. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवस्थान ट्रस्टतर्फे महापूजा व रथपूजा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष नामदेव बोरगुडे, सरपंच निशा पाठक, उपसरपंच मोतीराम भवर, यात्रा कमिटीच्या चेअरमन गायत्री बोरगुडे, ग्रामविकास अधिकारी उज्ज्वला भोईर यांनी दिली.
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथे यंदाही पौष पौर्णिमेला श्री मतोबा महाराज यात्रोत्सव भरविण्यात येत आहेे. हा उत्सव अखंड 15 दिवस सुरू राहणार आहे. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटे पाचला भागवताचार्य हभप ज्ञानेश्वर माउली शिंदे (साधना आश्रम, रुई) व नाशिक येथील तेजल मेडिकलचे संचालक सुनील जवरीलाल जैन, भारती सुनील जैन यांच्या हस्ते श्री मतोबा महाराजांच्या नवीन चांदीच्या मूर्तीची महापूजा केली जाणार आहे.
सकाळी 8.30 ला बोकडदरे येथील भारतमाता आश्रमाचे महंत श्री महामंडलेश्वर 108 जनेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते रथपूजा होणार आहे. यंदा रथ मिरवणुकीस प्रारंभ करताना रथाला पहिली बैलजोडी जुंपण्याचा मान सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील शेतकरी नंदकिशोर महात्मे यांना देण्यात आला आहे. देवस्थान परिसरात विविध ठिकाणी बांधकाम केले असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी देवस्थान ट्रस्टने विशेष प्रयत्न केले आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शनरांगेची बांबू-बल्याची बांधणी केली आहे.
भाविकांचे उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिरासह परिसरात गर्दीच्या नियंत्रणासाठी स्वयंसेवकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यासाठी स्वयंसेवकांना टी-शर्ट देण्यात आले आहेत. भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. नारळ फोडण्यासाठी मशिनची व्यवस्था केली आहे. यात्रा कालावधीत दररोज सकाळी सहाला, दुपारी बाराला व सायंकाळी सातला संगीतबद्ध आरतीचे नियोजन
केले आहे.
ग्रा.पं. व्यवस्थापनाकडून तयारी पूर्णत्वास
श्री मतोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त नैताळेसह परिसरात व्यावसायिकांसाठी जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करून मुरूम टाकून जागा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांच्या मनोरंजनासाठी छोट्या-मोठ्या पाळण्यांना योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दोन टँकर व ट्रॅक्टरचे नियोजन केले आहे. यात्रोत्सवाच्या 15 दिवसांच्या कालखंडात मंदिर परिसर, नैताळे शहरात स्वच्छता राहावी, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. नैताळे शहराकडे येणार्या सर्व रस्त्यांच्या बाजूला खासगी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
Shri Matoba Maharaj Yatra begins today
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…