नाशिक

शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन कटिबद्ध

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान : मुक्त विद्यापीठात किसान सुसंवाद

नाशिक : प्रतिनिधी
शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार विविध उपक्रम राबवत आहे. त्याच अंतर्गत कृषी मंत्रालयासोबत सिंचन, पशुपालन यांसारखी पूरक विभाग आणि देशभरातील कृषी विज्ञान केंद्रे कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित किसान सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सहाय्यक महानिदेशक डॉ. राजश्री रॉय बर्मन, कृषी प्राद्योगिकी अनुसंधान संस्थान संचालक डॉ. एस. के. रॉय, कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, राज्य शासन कृषी विभागाचे संचालक रफिक नायकवाडी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे वैज्ञानिक डॉ. शाकीर अली सय्यद, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके उपस्थित होते.
मंत्री चौहान म्हणाले की, शेतकर्‍यांमध्ये देव पाहावा. विज्ञानाने काहीही साध्य केले तरी शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या अन्नाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकर्‍यांना उत्पादनासाठी प्रोसेसिंग युनिट व विविध सुविधा दिल्या जातील. केंद्र शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात असून, शेतकर्‍यांना त्याबाबत माहिती देण्यात येईल. त्यांनी लहरी हवामान व कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतकर्‍यांना एकात्मिक शेती पिकाबरोबर पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, फळे-भाजीपाला यांसारख्या पूरक व्यवसायांची सांगड घालण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे तयार केलेल्या यश मायक्रो-न्यूट्रिएन्टस ग्रेड- 2 उत्पादनाचे लोकार्पण केले. महिला स्वयंसहायता बचतगट आणि शेतीसंबंधित स्टॉल पाहिले. संवाद साधला. नंतर बहावा रोपाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्याम कडूस पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शेतकरी, महिला बचतगट सदस्य व विद्यापीठ कर्मचारी उपस्थित होते.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago