सिंहस्थाला जागतिक आध्यात्मिक केंद्र बनविणार : भुवनेश कुमार
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविक आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देत या महापर्वाला जागतिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने नियोजनाला वेग दिला आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली.
बैठकीत कुंभमेळ्यासाठी आवश्यक पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांच्या सोयी-सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन विकास, ब्रँडिंग आणि देश-विदेशातील प्रसिद्धी या संदर्भातील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ तयारीची
सद्यःस्थिती सादर करत सुरू असलेल्या कामांची, प्रस्तावित प्रकल्पांची आणि विविध विभागांमधील समन्वयाची माहिती दिली.
नाशिक विभागीय आयुक्त तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसी नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन संचालनालय नाशिकचे उपसंचालक नंदकुमार राऊत, श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सिंहस्थ काळात लाखो भाविक आणि पर्यटकांच्या निवास, प्रवास आणि सांस्कृतिक अनुभव लक्षात घेऊन टेंट सिटी, सांस्कृतिक केंद्रे, इंटरप्रिटेशन सेंटर, डिजिटल अनुभव केंद्रे व प्रदर्शन सुविधा विकसित करण्याबाबत चर्चा झाली.
सिंहस्थासाठी उभारल्या जाणार्या प्रमुख सुविधा
♦ टेंट सिटी आणि तात्पुरती निवासव्यवस्था.
♦ सांस्कृतिक केंद्रे व इंटरप्रिटेशन सेंटर.
♦ डिजिटल अनुभव केंद्रे.
♦ प्रदर्शन व माहिती दालने.
♦ पर्यटक सुविधा केंद्रे.
♦ बहुभाषिक मदत व मार्गदर्शन व्यवस्था.
♦ आधुनिक डिजिटल सेवा व माहिती प्रणाली.
जागतिक प्रसिद्धीसाठी विशेष उपक्रम
♦ इन्क्रेडिबल इंडिया अंतर्गत देश-विदेशात प्रचार
♦ सिंहस्थ पर्यटन सर्किटची निर्मिती.
♦ प्रमुख पर्यटन स्थळांमधील कनेक्टिव्हिटी वाढविणे.
♦ हेली-टुरिझमसारख्या नावीन्यपूर्ण पर्यटन सुविधा.
♦ कलाग्राम व कल्चरल हाटची उभारणी.
♦ स्थानिक कला, संस्कृती व परंपरांना व्यासपीठ.
♦ पर्यटन क्षेत्रातील मनुष्यबळाचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धी.
Simhastha will be transformed into a global spiritual center: Bhuvnesh Kumar
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…