नाशिक

मनपाच्या सुधारित 8,877 आकृतिबंधास मिळणार मंजुरी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचा आकृतिबंध कोणत्या ना कोणत्या कारणांनी गेल्या काही वषार्ंपासून रखडल्याचे चित्र आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या प्रलंबित विविध सुधारित 8,877 पदांच्या आकृतिबंधास शासनाच्या नगरविकास विभागाची पावसाळी अधिवेशनापूर्वी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्य शासनाने यासंदर्भात नगरविकास विभागाने महापालिकेकडून पुन्हा एकदा तातडीची बाब म्हणून कार्यरत कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचार्‍यांची माहिती तातडीने पाठविण्याचे निर्दे-श मनपा प्रशासनाला शुक्रवारी (दि.12) दिले आहेत. त्यानुसार आज, शनिवारी सर्व विभागांना त्यांच्याकडील अद्ययावत माहिती सादर करण्याचे आदेश दिले.
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होत आहे. दरम्यान, गेल्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांची पूर्तीचा आढावा घेतला जात आहे. यात नाशिक महापालिकेच्या आकृतिबंधाचाही समावेश आहे. त्यामुळे आकृतिबंधाला अधिवेशनापूर्वी मंजुरी मिळण्याची शक्यता बळावली आहे. नगरविकास विभागाच्या सूचनांनुसार महापालिकेने आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर आता यासंदर्भातील संचिका अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयात सचिवांच्या टेबलवर सादर करण्यात आली असून, त्यामुळे आकृतिबंध मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
नाशिक महापालिकेचा समावेश ’ब’वर्गीय महापालिकेत असला तरी आस्थापना परिशिष्ट मात्र ’क’वर्गीयच आहे. सद्यःस्थितीत या आस्थापना परिशिष्टावरील 7,725 मंजूर पदांपैकी सुमारे 3,800 पदे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे काम करताना अडचणी निर्माण होतात. ’ब’वर्गीय आस्थापनेनुसार महापालिकेने सुधारित आकृतिबंध तयार करून शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला आहे. आठ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही या आकृतिीबंधाला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही.

शासनाचे महापालिकेला पत्र
प्रलंबित विविध संवर्गांतील 8,877 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. या आकृतिबंधातील सर्व त्रुटींची पूर्तता महापालिका प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर आता यासंदर्भातील संचिका नगरविकास विभागाच्या सचिवांच्या मंजुरीसाठी आधीच सादर करण्यात आहे. तरीही राज्याच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी महापालिकेला पत्र पाठवून सद्यःस्थितीत कार्यरत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांची माहिती तातडीची बाब म्हणून शनिवारी (दि. 13) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Municipal Corporation’s revised staffing pattern of 8,877 posts to receive approval.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago