नाशिक

सिंहस्थाची कामे प्राधिकरण नव्हे, मनपामार्फतच व्हावीत

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामे सुरू आहेत. या कामांचे महापालिका प्रशासनाने सादरीकरण (प्रेझेंटेशन) केले. दरम्यान, सत्ताधारी भाजप-शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी मात्र या प्रेझेंटेशनवरून प्रशासनाची कोंडी करत महापालिका सक्षम असताना प्राधिकरणामार्फत कामे करण्याची आवश्यकता का?, तसेच प्रशासनाने प्रेझेंटनेशन उत्तम केले मात्र, आम्हाला प्रेक्षक असल्यासारखे वाटले, असा टोला शिंदेसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी प्रशासनाला लगावला.

महापालिकेत सोमवारी (दि.20) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. महासभेच्या प्रारंभीच शहरात दीड वर्षाने होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी शहरात विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली.
प्रेझेंटेशन झाल्यानंतर सत्ताधार्‍यांनी प्रशासनासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. ज्येष्ठ नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी प्रशासनाने प्रेझेंटेशन खूप चांगले केले; परंतु सिंहस्थ प्राधिकरणामार्फत कामे सुरू असताना महापालिका व नगरसेवक म्हणून आपली भूमिका काय आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करावे. महापालिका कोट्यवधींची कामे करीत असताना त्यात मनपाचा किती टक्के हिस्सा आहे? हे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. शिंदेसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी सिंहस्थ प्राधिकरणावर सवाल उपस्थित केले. शहरात प्राधिकरणामार्फत कामे सुरू आहेत, त्याबाबत नगरसेवक म्हणून कोणालाही काही माहिती नाही. शहरात काय कामे चालली आहेत, याची विचारणा प्राधिकरणाला कोणी करणार आहे का नाही? सिंहस्थात एखादी दुर्घटना घडल्यास त्याचे पाप आपल्याच म्हणजे महापालिकेच्याच माथी मारले जाईल, अशी भीती बोरस्ते यांनी व्यक्त केली. त्यामुळे सिंहस्थाची कामे महापालिकेमार्फतच करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीला सभागृहातील सदस्यांनी बाक वाजवत प्रतिसाद दिला. सिंहस्थाचे काम करणारी कोणती एजन्सी आहे, काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितलेे. सिंहस्थाच्या नावाने हजारो कोटींच्या कामांची घोषणा केली जाते. मात्र, नगरसेवकांना तुटपुंजा निधी मिळत असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.

दिवे म्हणाले, मग निधी कमी का?
सिंहस्थासाठी मनपाने 15 हजार कोटींची मागणी केली असता, त्यांपैकी चौदाशे कोटी मंजूर झाल्याचे प्रेझेंटेशनमधून सांगण्यात अले. यावर शिंदेसेनेचे नगरसेवक राहुल दिवे यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, मुख्यमंत्री नेहमी सांगतात की, पैसा कमी पडू देणार नाही. मग आता निधी कमी का पडतो आहे? आम्ही कमी पडतो आहोत का? असे म्हणत त्यांनी यावरून सवाल उपस्थित केला. महापालिका सक्षम असताना इतर एजन्सींमार्फत काम करण्याची आवश्यकता का, असाही सवाल केला.

38 विषयांना चर्चेविनाच मंजुरी
महासभेत वेळेअभावी अनेक विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे गंगापूर रोड परिसरातील गोदावरी नदीपात्रातील जलपर्णी काढणे, नदीकाठ स्वच्छता, यंत्रसामग्री भाड्याने घेणे, नवीन नाशिकमधील उद्याने व मोकळ्या जागांची देखभाल, सुरक्षारक्षकांची नियुक्ती, नागरी वस्ती सुधार योजना आणि मनपा शाळांमधील मूलभूत सुविधांसाठी निधी, अशा काही विषयांना चर्चेविनाच मंजुरी देण्यात आली.

आठ कोटी भाविकांचा अंदाज
दीड वर्षाने होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यास शहरात आठ कोटी भाविक येण्याचा अंदाज प्रेझेंटेशनद्वारे वर्तविण्यात आला. दरम्यान, प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर नगरसेवकांना प्रभागात मोठी विकासकामे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाकडून म्हणावा तसा निधी दिला नसल्याची भावना नगरसेवकांनी बोलून दाखवली.

Simhastha’s work should be done through the municipality, not the authority.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

5 minutes ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

11 minutes ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

28 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

43 minutes ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

49 minutes ago

माळमाथा परिसरातील पाणी योजनेचा बोजवारा

दूषित पाण्यामुळे 25 गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात मालेगाव : प्रतिनिधी तालुक्यातील माळमाथा परिसरातील दहिवाळसह सुमारे…

56 minutes ago