नाशिक

शहरात उष्णतेचा चटका

वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता

नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाने एप्रिल महिन्यातच चाळीशीचा उंबरठा गाठण्यास सुरुवात केली आहे. 20 एप्रिल रोजी नाशिकमध्ये कमाल तापमान 39.3 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर किमान तापमान 21.8 अंश होते. सकाळी वातावरणात 66 टक्के आर्द्रता होती; मात्र सायंकाळपर्यंत ती 33 टक्क्यांपर्यंत घसरल्याने उकाड्यात अधिकच वाढ झाल्याची जाणीव नागरिकांना झाली. सकाळच्या सत्रात 1.8 मिमी पावसाची हलकी नोंद झाली.
उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या सुमारास रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होत असून, थंड पेये, उसाचा रस, फळांचे ज्यूस यांना मोठी मागणी वाढली आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिक सावधगिरी बाळगत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत 21 व 22 एप्रिल रोजी हवामानात बदल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता ङ्गअत्यंत संभवफ असल्याचे सांगण्यात आले आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता असल्याने हवामानात अचानक बदल जाणवू शकतो. विशेषतः दुपारनंतर वातावरणात ढगांची गर्दी होऊन संध्याकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी, बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने वीज कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, तसेच जोरदार वार्‍यामुळे झाडे किंवा होर्डिंग्जपासून दूर राहावे, असेही आवाहन केले आहे.

अशी घ्यावी खबरदारी
दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे
भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे
वीज कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये.
जोरदार वार्‍याच्या वेळी सैल वस्तू व सुरक्षितता तपासावी.
शेतकर्‍यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

Heatwave in the city

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

5 minutes ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

11 minutes ago

माळमाथा परिसरातील पाणी योजनेचा बोजवारा

दूषित पाण्यामुळे 25 गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात मालेगाव : प्रतिनिधी तालुक्यातील माळमाथा परिसरातील दहिवाळसह सुमारे…

18 minutes ago

खतांच्या अकृषक वापराला आळा बसणार

सुभाष काटकर : खत कंपन्यांचे प्रतिनिधी, घाऊक विक्रेत्यांची बैठक मालेगाव : प्रतिनिधी खतांच्या वितरणात पारदर्शकता…

25 minutes ago

शासकीय कर्मचारी आजपासून संपावर

नाशिक : प्रतिनिधी राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजनेबाबत दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. प्रशासकीय उदासीनतेचा…

34 minutes ago

लिफ्ट कोसळून महिला व तीन बालके जखमी; गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी जेलरोड परिसरातील राहुलनगर येथे एका नामांकित सोसायटीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना…

36 minutes ago