filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0010,0.0000; brp_del_sen:0.1000,0.0000; motionR: 65537; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8388608;cct_value: 0;AI_Scene: (6, 0);aec_lux: 137.74846;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 65536;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 33;zeissColor: bright;
सिन्नरकर शोकसागरात
सिन्नर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच सिन्नर शहरात शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सिन्नर शहरात फिरून हात जोडून केलेल्या आवाहनाला बाजारपेठेतील व्यापार्यांनी साथ देत आस्थापना बंद ठेवून शहरात कडकडीत बंद पाळला. शहराबाहेरील काही दुकानांचा अपवाद वगळता शहरातील बाजारपेठेत सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रितरीत्या शहर बंदची हाक दिली. नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते सागर भाटजिरे, नगरसेवक बाळू उगले, पंकज जाधव, शेखर गोळेसर, उबाठाचे गटनेते मनोज देशमुख, पंकज मोरे, सागर कोथमिरे, माजी बांधकाम सभापती राजेंद्र चव्हाणके, प्रा. राजाराम मुंगसे, अनिल वराडे, हरिभाऊ तांबे, हरिभाऊ वरंदळ आदींसह सर्वपक्षीय नेत्यांनी शिवाजी चौक येथून बाजारपेठ, वाजे विद्यालय, खासदार पूल, गंगाधर टॉकीज, नाशिक वेस, व्यापारी बँक चौक, पोस्ट ऑफिस, मार्केट आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात फिरून सिन्नरकरांना अजितदादांच्या दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सिन्नरकरांनी प्रतिसाद देत शहर बंद ठेवून
दुखवटा पाळला.
शुक्रवारी 4 वाजता शोकसभा
उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिन्नरकरांच्या वतीने शुक्रवारी (दि.30) दुपारी 4 वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या स्वर्गीय अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात ही सभा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी दिली.
Sinnar market strictly closed
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik