सिन्नरकडे गाद्या घेऊन येत असताना घडली घटना
सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक- पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात गाद्या घेऊन जाणारा छोटा हत्ती टेम्पोला अचानक आग लागून पेटल्याची घटना सोमवारी (दि.6) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. नाशिक रोड येथून सिन्नरकडे गाद्या घेऊन येत असताना मोहदरी घाटात गणपती मंदिराजवळ टेम्पोने अचानक पेट घेतला.
या आगीत सुमारे 30 हजार रुपये किमतीच्या गाद्या जळून खाक झाल्या. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने त्याचा जीव वाचला. जाकीर गणी पिंजारी यांचा विहीतगाव येथे गादी बनवण्याचा कारखाना आहे. दुपारी ते स्वतः छोटा हत्ती टेम्पो (एमएच 02 / एआर 6963) मधून सुमारे 47 गाद्या घेऊन सिन्नर येथे डिलिव्हरी करण्यासाठी येत होते. मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ चालक सीटच्या खालून अचानक धूर येऊ लागल्याने त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवत सीट बाजूला घेतले. यावेळी आगीचा भडका उडाला. त्यांनी सोबत असलेल्या पाण्याच्या ड्रम मधील पाणी शिंपडण्याचा प्रयत्न केला.
मात्र आग आणखीनच भडकली. रस्त्याने जाणार्या अनेक वाहनधारकांनी थांबून त्यांच्या जवळील पाणी शिंपडले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण टेम्पो कवेत घेतला. टेम्पोच्या पाठीमागच्या बाजूने 12 ते 15 गाद्या काढण्यात यश आले. मात्र उर्वरित सुमारे 30 हजार रुपयांच्या गाद्या आगीत खाक झाल्या. माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी
आग विझवली.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…