पंचवटी : वार्ताहर
सर्पमित्र साप म्हटले की , भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडून जाते . परंतु , महसूल विभागातील तहसीलदार साहेबराव सोनवणे हे एका सापाचा जीव वाचविण्यासाठी रात्रीच्या सुमारास धावून गेले . त्यामुळे सापाला जीवदान मिळाले .
साप दिसला की , सगळेच हादरून जातात . काहींची तर भीतीने गाळणच उडते . पण प्रशासकीय सेवेत कार्यरत असतानाही सर्पमित्र म्हणून तहसीलदार सोनवणे यांचे नवीन रूप नागरिकांना पहावयास मिळाले . रात्री ९ ते १० च्या सुमारास मखमलाबाद परिसरातील मानकर मळा , खंडेराव मंदिर भागातील दिशा शिवदर्शन रोबंगलो भागात हेमंत सूर्यवंशी यांना साप दिसला . तेव्हा त्यांनी लागलीच रो- बंगल्यातील एकाला सांगितले की , या ठिकाणी साप आहे . तेव्हा तेथील नागरिकांनी जवळच राहणाऱ्या नाशिक येथील महसूल आयुक्तालयातील सर्पमित्र असलेले तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना कळविताच तेही हजर झाले . त्यांच्यासमवेत त्यांचा मुलगाही
आला होता . साप जवळपास अडीच ते तीन फुटांचा होता . परंतु , ज्यांनी पाहिला त्यांना तो काय आहे हेही माहीत नसल्याने तेही जरा घाबरून गेले होते . परंतु , सोनवणे आल्यानंतर त्यांनी घाबरून जाऊ नका , डूरक्या घोणस जातीचा साप असल्याने तो विषारी नाही असे सांगितले . त्यांनी तात्काळ त्या सापाला पकडून ताब्यात घेतले . जेव्हा सूर्यवंशी यांनी इतका मोठा अधिकारी असूनही त्यांनी साप पकडला तेव्हा त्यांचे आभार मानले . तेव्हा सोनवणे यांनी माझे नका आभार मानू , तुम्हीच एका सापाचा जीव वाचवला , असे सांगितले .
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…