सोन्याला आला भाव, चोर साधताहेत डाव

शहरात सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद
नाशिक : अश्‍विनी पांडे
सोन्याचे भाव 52 ते 54 हजारांच्या दरम्यान गेले असताना चोरट्यांची मात्र दिवाळी होत आहे. वाढलेल्या भावामुळे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हजारो रुपयांच्या मुद्देमालावर चोरटे डल्ला मारत असल्याने चोरट्यांची एकप्रकारे दिवाळीच होत आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खून, बलात्कार, घरफोडी, चेन स्नॅचिंग यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा जरब आहे की नाही, असा प्रश्न सतत घडणार्‍या गुन्हेगारीच्या प्रकारामुळे निर्माण झाला आहे. त्यात चेन स्नॅचिंग प्रकाराने तर शहरात सोने घालून फिरणे नागरिकांना कठीण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या चेन स्नॅचिंगचा प्रकारामुळे शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सोन्याला आलेल्या झळाळीमुळे चोरटे सोन्यावर डल्ला मारत आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी यांसारख्या गोष्टी ओरबाडण्यात येत आहेत. तसेच पर्स, मोबाइल या गोष्टीही ओरबाडून नेल्या जात आहेत. त्यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोन्याला आता प्रतितोळा 50 हजारांहून अधिक भाव आहे. परिणामी चोरांकडून हीच बाब लक्षात घेत सोने चोरले जात आहे. अनलॉकनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दररोज शहरातील विविध भागात दररोज तीन ते चार चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याचे उघडकीस येत आहे. या घटना कमी वर्दळ असलेल्या ठिकाणासोबत वर्दळीच्या ठिकाणीही घडत असल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गंगापूर रोड या कमी वर्दळीच्या भागात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढते आहे. तर सातपूर आणि अंबड या एमआयडीसी भागात तर रात्री आणि दिवसाही चेन स्नॅचिंग, मोबाइल आणि पैसे काढून घेण्यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे आधीच कोरोनानंतर महागाईचा सामना करणार्‍या नागरिकांना कष्टाने जमवलेल्या सोन्यावर चोर ताव मारत असल्याने जगायचे कसे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. परिणामी, वाढत्या गुन्हेगारीच्या घटनाही नाशिक शहर क्राईम कॅपिटल बनतय की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago