नाशिक

गोदाकाठ भागातील कामांचा वेग वाढवा

आ. फरांदे : कुंभमेळा, पावसाळी, गोदाकाठच्या कामांची पाहणी

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि तोंडावर आलेला पावसाळा पाहता नाशिक महापालिकेच्या वतीने गोदाकाठी सुरू असलेल्या विविध कामांचा वेग वाढविण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी दिले.
आमदार फरांदे यांनी रविवारी (दि. 31 मे) गोदावरी काठ परिसरात सुरू असलेल्या पावसाळी व भूमिगत गटार पाइपलाइन, रामझुला पूल आणि सराफ बाजार रस्ता या कामांची पाहणी केली. गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण आणि नाल्यांच्या सफाईबाबत त्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या.
आ. फरांदे यांनी महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांसह गोदाकाठचा दौरा केला. यावेळी त्यांनी विकासकामांचा आढावा घेतानाच गोदावरी कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित होता कामा नये, असे सांगितले. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता करून दहीपूल, मेनरोड परिसरात पाणी साचणार नाही, याचे अचूक नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

या केल्या सूचना

मेकॅनिकल गेट : गोदावरीतील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अहिल्याबाई होळकर पूल परिसरात उभारलेल्या मेकॅनिकल गेटच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांत स्वतंत्र दौरा केला जाणार आहे. पायाभूत सोयी : रविवार कारंजा ते एकमुखी दत्तमंदिर रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचे निर्देश दिले. सांडपाणी व्यवस्थापन : पावसाळी पाणी आणि सांडपाणी वाहून नेणार्‍या पाइपलाइन पूर्णपणे वेगळ्या असाव्यात जेणेकरून सांडपाणी थेट गोदावरीत मिसळणार नाही. गांधी तलाव : परिसराच्या सौंदर्यीकरणासोबतच फिल्टरेशन प्लांटच्या नियोजनावर भर द्यावा. भद्रकाली सबस्टेशन : भद्रकाली परिसरात उभारल्या जाणार्‍या महावितरणच्या सबस्टेशन जागेचे सर्वेक्षण करावे.

मंदिरांच्या दुरुस्तीकडे लक्ष

गोदावरी काठावरील पुरातन मंदिरांचे जतन करण्यासाठीही आमदार फरांदे आग्रही आहेत. विशेषतः देवमामलेदार मंदिराला तडे गेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने दुरुस्तीच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. गोदाकाठावरील सर्व पुरातन मंदिरांची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. या पाहणी दौर्‍यावेळी नगरसेवक शाहू खैरे, राहुल शेलार, आदिती पांडे, माजी महापौर विनायक पांडे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे व समीर रकटे आदी उपस्थित होते.

नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरीचे रक्षण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे. येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर गोदाकाठचे सुशोभीकरण आणि सुरक्षितता याला आमचे प्राधान्य आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये आणि सांडपाणी गोदावरीत मिसळू नये, यासाठी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांना कामात गती आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोणत्याही विकासकामांत दर्जाशी तडजोड केली जाणार नाही. – आमदार प्रा. देवयानी फरांदे

Speed ​​up work in the Godavari area

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago