नाशिक

रामवाडीत भरधाव कारने चौघांना उडविले

नाशिक : रामवाडी परिसरातील श्रद्धा पार्क इमारतीसमोर रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभ्या असलेल्या पती-पत्नी तसेच इतर दोघे भाऊ अशा चौघांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना रविवारी (दि. 4) रात्री सव्वाअकरा वाजता घडली. अपघातानंतर कार पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनावर आदळली. अपघातात चौघे जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. इनोव्हाचालकाने घटनास्थळातून वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. ज्या कारने चौघांना धडक दिली त्या वाहनाचा चालक व वाहनातील इतर चौघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. अपघात प्रकरणी मखमलाबाद रोड, वडजाईमातानगरला राहणार्‍या शुभम रमेश क्षीरसागर यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यावरून निफाड तालुक्यातील चांदोरी येथील कारचालक चेतन संतोष विसपुते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शुभम क्षीरसागर, त्याचा भाऊ सौरभ क्षीरसागर, त्यांचे भाडेकरू सागर कापडे व त्यांची पत्नी कुसुम कापडे असे चौघे जण गप्पा मारत असताना चौघुले पेट्रोलपंपाकडून भरधाव वेगाने आलेल्या कारने (एमएच 15 जीए 7821) सागर यांना व त्यांच्या पत्नीला उडविले. त्यानंतर बाजूला उभ्या दोघा क्षीरसागर बंधूंवर कार धडकली आणि कार पुढे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनावर जाऊन आदळली. अपघातात क्षीरसागर बंधू तसेच कापडे पती-पत्नी जखमी
झाले आहेत.
या अपघातात सागर कापडे याच्या पोटाला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Speeding car hits four people in Ramwadi

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

निफाडच्या बनावट नोटा प्रकरणातील संशयिताला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

निफाड : तालुका प्रतिनिधी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेशी संलग्न असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये…

20 minutes ago

मुलींना अश्लील व्हिडीओ पाठवून धमकावणारा जेरबंद

अंबड गुन्हे शाखा युनिट तीनची यशस्वी कारवाई सिडको : प्रतिनिधी वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्‍या मुलींना…

25 minutes ago

परवाना नसलेल्या रॅपिडोर्र्, उबरच्या ई-बाईकवर कारवाई

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम- 2025 अंतर्गत कोणताही अधिकृत परवाना नसताना शहरात अवैधरीत्या…

30 minutes ago

मतभेदाच्या नावाखाली सरकार पाडले, हेच पक्षांतर!

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाला कोंडीत पकडणारा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : प्रतिनिधी…

39 minutes ago

खुनातील आरोपीच्या निर्घृण हत्येचा प्रयत्न

पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार पुणे : प्रतिनिधी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्र. 4…

48 minutes ago

‘स्वीकृत’ने उघडी पाडलेली सत्तालालसा!

- सचिन अहिरराव नाशिक महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्त्यांवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं. पण त्याआधी बरीच…

53 minutes ago