नाशिक

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ व प्रतिबंधित औषधांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत गुजरातहून मालेगावात आणण्यात आलेला अल्प्राझोलम गोळ्या व कोडीन सिरपचा साठा जप्त केला. या कारवाईत तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 6 लाख 35 हजार 879 रुपयांचा मुद्देमाल तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टाटा पिकअप वाहन व तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ही माहिती मालेगाव शहराचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी शुक्रवारी नियंत्रण कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सूरज गुंजाळ यांनी सांगितले की, 20 ऑगस्टला पोलिसांना गुजरातहून पिकअप वाहनातून प्रतिबंधित औषधांचा साठा मालेगावात आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने काली कुट्टी मैदान परिसरात सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी केली. या कारवाईत अल्प्राझोलमच्या 67 हजार 200 गोळ्या म्हणजेच 4 हजार 480 स्ट्रिप्स तसेच कोडीन सिरपचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किमतीचे टाटा पिकअप वाहन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले तीन मोबाइल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 6 लाख 35 हजार 879 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींमध्ये गुजरातमधील उमरवाडा, सुरत येथील फिरोज खान लुकमान खान, मालेगावातील शिकारी चौक येथील रईस खान सय्यद खान आणि दियाना रमजानपुरा येथील वाहिद खान हसन सिद्दीक हसन यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी फिरोज खान हा यापूर्वी आझादनगर व पवारवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस व एमओसीए कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले असून, प्रतिबंधित औषधांचा साठा मागविणार्‍या तसेच या तस्करीच्या साखळीत सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Stock of banned medicines seized in Malegaon

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago