60 हजार रुपयांसह बिअर बाटल्या चोरल्या
उमराळे बुद्रुक : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील रॉयल बिअर अँड वाइन शॉपीमध्ये अज्ञात चोरट्यांकडून शॉपीचे जाळीचे कुलूप तोडून आतील गल्ल्यात ठेवलेले 60 हजार रुपये तसेच वाइनच्या बाटल्या चोरून नेल्या असून, उमराळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, रविवार दिनांक 1 जून रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी उमराळे येथील रॉयल बिअर शॉपीचे शटर तोडून आत प्रवेश करीत, गल्ल्यातील 60 हजार रुपये तसेच बिअरच्या बाटल्या चोरून नेल्याचे मालक प्रवीण केदार यांनी सांगितले. वाइन शॉपी चालविणारे दिनेश वाघमारे यांनी वाइन शॉपीमध्ये चोरी झाल्याचे केदार यांना कळविले असता शॉपीमध्ये बिअरच्या बॉटलचे खोके अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यावेळी त्यांनी तत्काळ दिंडोरी पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती कळविली असता, दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी याबाबतची माहिती पी.आय. किसन काळे यांना कळवून सदरील घटनेची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिंडोरी पोलीस स्टेशनचे आवारी, जाधव कॉन्स्टेबल भोईर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…