महाराष्ट्र

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती

मुंबई :
नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी धरून अतिशय सुनियोजितपणे आखल्याचे सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिवराज मोटेगावकरच्या तपासात विविध धक्कादायक माहिती समोर येत
आहे.
शिवराज मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक एनटीएशी निगडित प्राध्यापकांशी मोटेगावकरचे संबंध होते. पी. व्ही. कुलकर्णीसोबत मोटेगावकरचे घनिष्ट संबंध आहेत. मोटेगावकरने परीक्षेपूर्वीच प्रश्न मिळवून उत्तरांसह मुलांपर्यंत पोहोचवले. मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये पेपरफुटीचे अनेक पुरावे मिळाले. त्यानंतर आता शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीदेखील सीबीआय कार्यालयात चौकशी सुरू आहे. शिवराज मोटेगावकर याच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे, शिवराज मोटेगावकरच्या मुलाने बारावीची परीक्षा दिली आहे आणि, त्यालाही फुटलेल्या नीट प्रश्नपत्रिकाचा फायदा झाल्याचा बोललं जात आहे. शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणार्‍या आणखी तीन विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह सीबीआय ऑफीसमध्ये चौकशी केली जात आहे.
स्वतःच्या मुलाला फायदा
नीटचा पेपर फुटला, त्याचा शिवराज मोटेगावकर कसा बाजार मांडला याच्याबद्दल सीबीआयने जो रिमांड रिपोर्ट सादर केला त्यामध्ये सांगितलं होतं, हा पेपर विकताना पैसे कमावताना, शिवराज मोटेगावकरने त्याच्या स्वतःचा मुलगा जो आता नुकताच बारावी परीक्षा आणि नीटची परीक्षा दिली आहे, त्या स्वतःच्या मुलालादेखील या फुटलेल्या पेपरच्या माध्यमातून फायदा पोहोचवण्याचं काम केलं किंवा या मुलाला आधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली, अशा प्रकारची सीबीआयची माहिती आहे. त्यामुळे सीबीआयने शिवराज मोटेगावकरच्या मुलाला सीबीआयच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलवले आहे. शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत दोन ते तीन वकील देखील आहेत. कारण शिवराज मोटेगावकरचा मुलगा हा बारावीला म्हणजे अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याच्यासोबत वकील देखील आहेत. शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत इतर काही शहरांमध्ये देखील पालक आणि विद्यार्थी आहेत, जे या शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकत होते. त्याचबरोबर शिवराज मोटेगावकर कडून मुलांना फुटलेला पेपर मिळाला असल्याचा संशय आहे. शिवराज मोटेगावकरच्या बँक अकाउंटमध्ये काही ट्रांजेक्शन आढळून आलेले आहेत, जे या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून झाले आहेत, त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांना देखील त्यांना देखील पुण्यात सीबीआय ऑफिसने चौकशीसाठी बोललेले आहे, शिवराज मोटेगावकरचा मुलगा आणि तीन विद्यार्थी आणि पालक यांची चौकशी सीबीआयच्या पुण्यातील कार्यालयात होते आहे.

मनीषा मांढरेने वापरली अनोखी ट्रिक

नीट पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रा. मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान मनीषा मांढरेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा मांढरेची स्वत:ची स्मरणशक्ती चांगली होती. त्यामुळे याच स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला. मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. तिच्या या ट्रिकने सीबीआय यंत्रणाही चक्रावली आहे.

सीबीआयला पुरावे शोधावे लागतील

पेपरमधील सर्व प्रश्न डोक्यात ठेवून मनीषा मांढरेने विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवले. तसेच गेल्या 25 वर्षांपेक्षा एकच विषय जास्त काळ शिकवल्याने कोणताही प्रश्न लिहून ठेवावा लागला नाही. त्यामुळे मनीषा मांढरेच्या विरोधात सीबीआयला पुरावे शोधावे लागतील.

मनीषा मांढरेवर निलंबनाची कारवाई

नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून मनीषा मांढरेच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासकीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Students, parents including Motegaonkar’s son on radar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago