नाशिक ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिक येथे सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी काल जागेची पाहणी करण्यात आली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांनी सातपूर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाहणी करत उद्योजकांशी चर्चा केली.
नाशिकच्या प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल
याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, गुंतवणूक सल्लागार दीपाली चांडक, भाजपा उद्योजक आघाडीचे प्रदीप पेशकार, कापसे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांचे पदाधिकारी, सहसंचालक पी.एम. वाकडे, इंद्रभान काकड, उपप्राचार्य (आय.टी.आय) मोहन तेलंगी. उच्चस्तर आयटीआयचे प्राचार्य चकोर, मुलींच्या आय.टी.आय प्राचार्य दीपक बाविस्कर, बीटीआय आरचे ऍप्रेंटीस ऍडव्हायजर जे.जे.पाटील, आर.एस. मुंडासे यांच्यासह स्टार्टअप्स्चे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाकरे यांच्या बंगल्यांचा हिशोब घेणारच
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची केंद्रे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथे सुरु करण्यात येणार आहे. ही सर्व केंद्रे सॅटेलाइट असणार आहे. या सेंटरमध्ये स्थानिक पातळीवर कौशल्याच्या ज्या गरजा आहेत त्यांचा विचार करून कोर्सेस आणि कार्य्रकम राबविणार आहेत. सर्व अभ्यासक्रमांमध्ये 60 टक्के जॉब आणि 40 टक्के प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये उद्योगांचा सहभाग मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. विद्यापीठाचे वैशिष्ये रोजगार कसे वाढवायचे. पारंपरिक विद्यापीठामध्ये नोकरींच्या संधी शेवटी असतात. परंतु महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात उद्योगांना एकत्र घेत कोर्सेस आणि कार्यक्रम घेत आहोत.सध्या पाच शाळांची निर्मिती केली असल्याचे पालकर यांनी सांगितले.
व-हाणे गावाजवळ तिहेरी अपघात ४ जण जखमी; सुदैवाने जीवितहानी नाही
नाशिक येथील केंद्रावर माहे जुन / जुलै, 2023 पर्यंत नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस असून उद्योगाभिमुख गरजा ओळखून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यात येणार आहे.
आंतराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षकही विद्यार्थ्यासाठी उपलब्ध होणार असून, यासह स्थानिक प्रशिक्षकही पूर्णवेळ असतील.विद्यापीठाच्या नियमांनुसार कामकाज चालणार आहे. स्कुल ऑङ्ग इजिनइरींग सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑङ्ग बिजनेस ऍन्ड कॉमर्स, स्कूल ऑङ्ग ह्युमॅनिटीज, स्कूल ऑङ्ग मीडिया आणि स्कूल ऑङ्ग इंटर डिस्पलनरी स्टडीजमध्ये ऍग्रीकल्चर हेल्थ केअर महत्वाच्या विषयांवर मनुष्यबळाची,स्कीलची कमतरता आहे. पॅरामेडीकल हेल्थची गरज आहे. त्यासाठी कौशल्यआधारित कोर्सेस आणणार आहे. उद्योगक्षेत्रात ज्या कौशल्याची गरज आहे त्या कोर्सेची उपलब्धता करण्यात येणार आहे. बारावी पास मुलांसाठी अभ्यासक्रम आणत आहोत.इनोव्हेशन हबची संकल्पना मांडण्यात आली आहे.
– डॉ.अपूर्वा पालकर (कुलगुरू महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ,)
साहित्यातून वंचितांचा हुंकार होण्याची गरज
मुलींसाठी कौशल्य विद्यापीठात ट्रेनिंगची संधी
इंजिनइरींचा बेस असलेल्या ज्या मुली काही कारणास्तव शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेल्या आहेत. अशा मुलींना सहा महिन्याचे ट्रेनिंग दिले जाणार
असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
व्यसनमुक्ती केंद्राचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न
नाशिक येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, समवेत सहसंचालक पी. एम वाकडे, इंद्रभान काकड, उपप्राचार्य मोहन तेलंगी, उच्चस्तर आयटीआयचे प्राचार्य चकोर, आयटीआय मुलींचे प्राचार्य दीपक बाविस्कर, बीटीआरआय चे अप्रेंटिस ऍडव्हायझर जे जे पाटील आदी.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…