नाशिक- वणी रस्त्यावर ओझरखेड जवळ एका गुलमोहराच्या झाडाच्या मध्यातुन अचानक झर्यासारखे पाणी येऊ लागले. ही वार्ता परीसरात पसरली. बघता बघता तिथे गर्दी झाली. अनेकांनी हा चमत्कार असल्याचे सांगितले. काहींनी मोबाईल मध्ये चित्रण केले. तर काहींनी तीर्थ समजुन बाटलीत ते पाणी भरून घरी नेले. सोशल मिडीयात सदरची चित्रफित पाहुन दुरून लोक येऊ लागले. कुणीही या मागचे कारण न जाणुन घेता चमत्कार समजून त्यावर विश्वास ठेवला. परीसरात या निमीत्ताने उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र या बाबतीत खरे कारण समजल्यावर गर्दी थांबली. अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डाॅ.टी.आर.गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.
” सदर झाडाखालून पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर हे झाड लावल्याचे समजते. झाडाची मुळे खाली वाढून पाईपलाईन मध्ये शिरली . झाड जिर्ण होताच पाण्याच्या दाबामुळे मुळ ,खोड यातुन पाणी वरती आले. पाईपलाईन पाण्याचा प्रवाह थांबविला असता झाडातून पाणी येणे थांबते,याचा अर्थ हा चमत्कार नाही लोकांनी अफवांवरविश्वास ठेऊ नये ”
– कृष्णा चांदगुडे.
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…