हैदराबाद :
संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ओडिशाच्या किनार्यावरून एकाच लॉन्चरवरून दोन स्वदेशी विकसित प्रलय क्षेपणास्त्रांचे लागोपाठ यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या चाचण्यांमुळे भारताच्या लढण्याच्या क्षमतेत मोठी भर पडली आहे. देशाच्या संरक्षणसज्जतेला नवे बळ मिळाले आहे.
वापरकर्ता मूल्यांकन चाचण्यांच्या अंतर्गत 31 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता ही चाचणी झाली. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही क्षेपणास्त्रांनी ठरवून दिलेल्या मार्गाचे अचूक पालन केले आणि सर्व उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण केली. चांदिपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीतील प्रगत ट्रॅकिंग सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्रांच्या कामगिरीची पुष्टी करण्यात आली, तर लक्ष्य क्षेत्राजवळ तैनात जहाजांवरील टेलिमेट्री प्रणालीद्वारे अंतिम टप्प्यातील घटनांची पडताळणी करण्यात आली.
प्रलय हे घन इंधनावर आधारित, लहान पल्ल्याचे अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून ते अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नेव्हिगेशन प्रणालींनी सुसज्ज आहे. या क्षेपणास्त्राची अचूकता अधिक असून, ते विविध प्रकारचे पारंपरिक वॉरहेड्स वाहून नेण्यास सक्षम आहे. वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असल्याने हे क्षेपणास्त्र लष्करासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रलय क्षेपणास्त्र प्रामुख्याने शत्रूच्या तळांवर, कमांड सेंटर्स, रडार प्रणाली आणि इतर सामरिक ठिकाणांवर अचूक हल्ला करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमरतच्या नेतृत्वाखाली डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योग भागीदारांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. या चाचण्यांना वरिष्ठ डीआरडीओ शास्त्रज्ञ, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी तसेच उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल डीआरडीओ, सशस्त्र दल, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे अभिनंदन केले.
Successful launch of two consecutive Pralyam missiles from a single launcher
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…