Categories: नाशिक

मोहदरी घाटात कंटेनरच्या धडकेत तिघांचा बळी

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात बुधवारी (दि. 31) सकाळी तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात आयटी अभियंता, भाजीपाला व्यवसाय करणार्‍या नाशिक येथील व्यापार्‍यासह तिघांचा मृत्यू झाला. भरधाव व विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनरने पिकअप व दुचाकीला धडक दिल्याने हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.

बाळासाहेब बाजीराव व्यापारी

 

आयटी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू

निर्मळ पिंपरी (ता. राहाता) येथील रहिवासी असलेला अवधूत निर्मळ (वय 23) मुंबई येथे एका खाजगी कंपनीत आयटी अभियंता म्हणून नुकताच रुजू झाला होता. सुट्टी घेऊन तो बुधवारी सकाळी मुंबई येथून नाशिकला उतरला. तिथून तो नातेवाइकांच्या पिकअपमध्ये बसून घरी निघाला असता, त्याच्यावर रस्त्यातच काळाने घाला घातला.

 

या भीषण अपघातात बाळासाहेब बाजीराव व्यापारी (वय 42, ह.रा. महाले फार्म, सिडको, नाशिक), अवधूत रामनाथ निर्मळ (23, रा. पिंप्री निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) आणि दुचाकीस्वार असे तिघे जागीच ठार झाले. मृत दुचाकीस्वाराची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.
मूळचे केलवड (ता. राहाता) येथील रहिवासी बाळासाहेब बाजीराव व्यापारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी महिंद्रा पिकअप (एमएच 15- जीव्ही 7149) घेऊन सिन्नरमार्गे राहात्याकडे निघाले
होते.
त्यांच्यासोबत नातेवाईक अवधूत रामनाथ निर्मळ (वय 23, रा. पिंप्री निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हाही त्यांच्यासोबत गावी निघाला होता. सकाळी सुमारे सव्वादहाच्या सुमारास मोहदरी घाटात सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या टाटा कंटेनरवरील (एमएच. 46 एआर. 2725) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो दुभाजक ओलांडून नाशिक बाजू कडून येणार्‍या लेनवर पलटी झाला. याच दरम्यान नाशिककडून सिन्नर कडे येणार्‍या पिकअप वाहनाला कंटेनरने जोरदार धडक दिली. याच वेळी नाशिक कडून सिन्नर कडे येणारी दुचाकी (एमएच. 15 सीबी. 6796) देखील कंटेनरच्या तडाख्यात सापडली. अपघातानंतर कंटेनर व पिकअप दोन्ही वाहने पलटी झाली, तर दुचाकीस्वार कंटेनरखाली दबला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी बाळासाहेब व्यापारी, अवधूत निर्मळ व दुचाकीस्वार शाजी फर्नांडो ( वय 50 रा. उपनगर, नाशिक) यांना मयत घोषित केले.
या घटनेमुळे व्यापारी आणि निर्मळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कंटेनर चालक अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मोहदरी घाटातील वाढते अपघात, जड वाहतुकीचा बेदरकार वेग आणि चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Three killed in container collision at Mohdari Ghat

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago