या कारणामुळे दिला जीव
देवळाली कॅम्प : वार्ताहर
येथे रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या मायलेकींच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात देवळाली कॅम्प पोलिसांना यश आले असून, अश्लिल फोटोच्या आधारे बदनामी करण्याच्या धमकीला कंटाळून मायलेकींनी आत्महत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेचे एकजणाबरोबर अनैतिक संबध होते. या इसमाकडे महिलेचे अश्लिल फोटो होते. या फोटोंच्या आधारे तो महिलेच्या मुलीबरोबरही संबध बनविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावरुन तो ब्लॅकमेल करुन बदनामीची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून या मायलेकींनी दिनांक 29 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही बाब विवाहितेच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर पत्नी व मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संबधित व्यक्तीविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिते करीत आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…