उन्हाळा स्पेशल
कोकोनट शेक
नारळपाणी पिऊन झाल्यानंतर शहाळ्यात असणाऱ्या मलाईपासून तयार होणारा हा एक मस्त पदार्थ. उन्हाळ्यात तर अगदी आवर्जून केला पाहिजे.- सगळ्यात आधी चमच्याने शहाळ्यातील मलाई काढून घ्या.- अर्धा कप मलाई असल्यास एक कप दूध, एक टेबल स्पून साखर, चिमुटभर विलायची पावडर, अर्धा कप नारळाचं पाणी, व्हॅनिला आईस्क्रिमचे दोन स्कूप, दोन- तीन आईस क्युब हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाका आणि त्याचा व्यवस्थित शेक करून घ्या. आता हा शेक रिकाम्या शहाळ्यात टाका. त्यावरचा आणखी एक स्कूप टाका. त्यावर काजू, बदाम किंवा तुम्हाला आवडणाऱ्या इतर सुकामेव्याचे काप टाका. त्यामध्ये एक मस्त स्ट्रॉ टाका आणि उन्हाळ्याच्या या गरमीत मस्त थंडगार कोकोनट शेक पिण्याचा आनंद लूटा.